एक्स्प्लोर

Pathaan Leaked Online : शाहरुखसह 'पठाण'च्या टीमला मोठा फटका, रिलीजच्या काही तास आधीच....

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा बहुचर्चित 'पठाण' हा सिनेमा रिलीजआधीच ऑनलाईन लीक झाला आहे.

Shah Rukh Khan Pathaan Leaked Online : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) चार वर्षांनी 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. उद्या (25 जानेवारी 2023)  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमाच्या निर्मात्यांसाठी आणि शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, Tamilrockers, Filmy4wap, Filmyzilla, Mp4movies, Pagalworld, आणि  Vegamovies सारख्या वेबसाईटवर 'पठाण' हा सिनेमा रिलीजआधीच लीक करण्यात आला आहे. या सर्व वेबसाईटवर 'पठाण' हा सिनेमा एचडी प्रिंटमध्ये उपलब्ध आहे. 

कोरोनामुळे प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत. पण शाहरुखच्या चाहत्यांना 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची उत्सुकता आहे. हजारो रुपये खर्च करत ते या सिनेमाची तिकीट विकत घेत आहेत. दरम्यान हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा फटका बसणार आहे.

निर्माते उचलणार मोठं पाऊल...

'पठाण' हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला तर अर्थातच या सिनेमाच्या कमाईवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करणारा हा सिनेमा प्रेक्षक आता घरबसल्या पाहत आहेत. त्यामुळे आता ज्या वेबसाईटवर 'पठाण' सिनेमा लीक झाला आहे त्या वेबसाईटवर निर्माते कारवाई करण्याची शक्यता आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

ट्रेलरदेखील झालेला लीक...

'पठाण' सिनेमाआधी या सिनेमाचा ट्रेलरदेखील लीक झाला होता. ट्रेलरची झलक, शाहरुखचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे रिलीजआधीच 'पठाण' सिनेमाचा अंदाज चाहत्यांना आला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'पठाण' किती कमाई करणार? 

'पठाण' या सिनेमाने रिलीजआधीच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 45 ते 50 कोटींची कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही या सिनेमाला जादू दाखवण्यात यश आलं आहे. त्यामुळे 'पठाण' हा सिनेमा पहिल्याच वीकेंडला 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. 

संबंधित बातम्या

Pathaan : 57 वर्षांचा किंग खान! 30 वर्षांपेक्षा अधिक काळ सिनेविश्वात कार्यरत; आजही चाहत्यांमध्ये शाहरुख खानची क्रेझ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
Embed widget