एक्स्प्लोर

Panchayat 3 Durgesh Kumar Aka Banrakas : पोटाची खळगी भरण्यासाठी अडल्ट चित्रपटही स्विकारले, पण डिप्रेशन आलं, त्यातच पंचायतचं शूट केलं, 'बनराकस'ची यशोगाथा!

Panchayat 3 Durgesh Kumar Aka Banrakas : 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये मिळालेल्या भूषणच्या व्यक्तीरेखेने दुर्गेशला लोकप्रिय केले. दरभंगातील एका लहानशा गावातून आलेल्या दुर्गेशचा सिनेजगतातील प्रवास सोपा नव्हता.

Panchayat 3 Durgesh Kumar Aka Banrakas : 'पंचायत' या (Panchayat) वेब सीरिजने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. सोशल मीडियावरही या वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. 'पंचायत' वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तिसऱ्या सीझनची उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वीच पंचायत वेब सीरिज रिलीज झाली. या तिसऱ्या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळाला. 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये सगळ्याच पात्रांनी लक्ष वेधून घेतले. पण, आपल्या अभिनयानेच नव्हे तर मीम टॅम्पलेटच्या माध्यमातून बनराकस अर्थात भूषण या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. बनराकसची छोटीशी व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता दुर्गेश कुमारचा (Durgesh Kumar) प्रवास हा कठीण, संघर्षाचा राहिला आहे. 

बिहारच्या कलाकाराने वाजवला डंका...

अभिनेता दुर्गेश कुमार हा  बिहारमधील दरभंगा येथील आहे. दुर्गेश कुमारने हायवे, बहन होगी तेरी, संजू, धडक सारख्या चित्रपटात काम केले. पण, पंचायत या वेब सीरिजमध्ये मिळालेल्या भूषणच्या व्यक्तीरेखेने दुर्गेशला लोकप्रिय केले. दरभंगातील एका लहानशा गावातून आलेल्या दुर्गेशचा सिनेजगतातील प्रवास सोपा नव्हता. जोश टॉकला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या करिअरच्या प्रवासाबाबत सांगितले.  

दुर्गेश कुमार यांनी सांगितले की,  मी ज्या ठिकाणाहून येतो. त्या ठिकाणी राहून तुम्ही अभिनेता बनण्याचा विचारही करू शकत नाही. पण, वृत्तपत्रांमध्ये मनोज वाजपेयींचा फोटो पाहून तेव्हा मला वाटायचे की बिहारचे लोकही हिरो बनू शकतात. बिहारमधला कोणताही मुलगा किंवा मुलगी UPSC ला आले की, माझे भाऊ-बहिण त्याचा/तिचा फोटो दाखवून मला UPSC साठी प्रेरित करायचे. यानंतर माझ्या भावाने मला थिएटरमध्ये जाण्यास सांगितले. व्यक्तिमत्व विकासासाठी नाटकात काम करण्यास सांगितले. 

दुर्गेश कुमारने पुढे सांगितले की, नाटकात काम करणे  मला आवडू लागले. त्यानंतर भावाने मला 12 वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यास सांगितले. त्यानंतर पुढील नाट्य शिक्षण कुठे मिळते हे पाहुयात असे सांगितले. माहिती घेतल्यावर दिल्लीत नाट्य प्रशिक्षण घेता येईल असे समजल्याने मी आणि भाऊ दिल्लीत आलो. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नोएडातील एका शाळेत शिकवू लागलो. त्याचवेळी एनएसडीमध्ये माझे शिक्षण सुरू झाले. 

अॅडल्ट चित्रपटात केले काम... 

दुर्गेशने सांगितले की, एनएसडीमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत आलो. कसेबसे त्याला इम्तियाज अलीच्या 'हायवे' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्याला 'फ्रीकी अली' आणि 'सुलतान'मध्ये छोट्या भूमिका मिळाल्या. पण तरीही त्याच्या जीवनातील गरजा पूर्ण करण्या इतपत पैसे मिळत नव्हते.  

उदरनिर्वाहासाठी त्याने सॉफ्ट पॉर्न चित्रपटांमध्येही काम केले असल्याचे दुर्गेशने सांगितले. त्याने म्हटले की, 'मी अभिनयाशिवाय राहू शकत नाही. भूमिका कोणतीही असो, मी ती नेहमीच उत्कटतेने साकारतो. निर्मात्यांनी चित्रपटासाठी कितीही पैसे गुंतवले असतील, मी त्या खर्चाची परतफेड करेन. माझा स्वतःवर इतका विश्वास होता. त्यामुळेच मी बालाजीच्या 'व्हर्जिन भास्कर' सीरिजमध्ये काम केले.

डिप्रेशनमध्ये केले चित्रीकरण...

आपल्यालाही डिप्रेशनचा सामना करावा लागला असल्याचे दुर्गेशने सांगितले. वर्ष 2013 ते 2022 या जवळपास 10 वर्षाच्या कालावधीत मला ऑडिशनमध्ये यश मिळत नव्हते. कास्टिंग डायरेक्टर मला सांगायचे की तू चांगला अभिनय करू शकतो. तुझ्यात क्षमता आहे. पण मी ऑडिशन पास करू शकत नव्हतो. मी प्रोडक्शन हाऊस आणि निर्मात्यांचा विश्वास जिंकू शकत नव्हतो. मग, लॉकडाउन सुरू झाले. या कालावधीत  मला काम मिळू लागले. 

एके दिवशी मला 'कास्टिंग बे'मधून ऑडिशनसाठी कॉल आला. त्यांनी सांगितले एक सीन आहे, फोटोग्राफरची भूमिका आहे करणार का? मी जाऊन ऑडिशन दिले, तीन टेक मध्ये माझे ऑडिशन शॉट ओके झाला. 

त्यानंतर मला पंचायतच्या पहिल्या सीझनमध्ये एक सीन दिला. हा एक सीन चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आज लोकांच्या मनात ही व्यक्तीरेखा असल्याचे दुर्गेश कुमार यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indrajeet Sawant: देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
पुण्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना; अजित पवारांची सूचना
पुण्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना; अजित पवारांची सूचना
Ranveer Allahbadia Statement Controversy Case: माझ्याकडून चूक झाली... सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून 'त्या' गुन्ह्याची कबुली; म्हणाला...
माझ्याकडून चूक झाली... सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून 'त्या' गुन्ह्याची कबुली; म्हणाला...
कांदा प्रश्न पेटला! निर्यात शुल्क हटवा, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
कांदा प्रश्न पेटला! निर्यात शुल्क हटवा, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Indrajit Sawant : 12 वाजता फोन, जातीवाचक शिव्या...इंद्रजीत सावंतांनी सांगितली पूर्ण कहाणीABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Ruat PC : न्यायालयावर राजकीय निर्णयांबाबत आम्हाला विश्वास राहिला नाहीBeed Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांची नेमणूक करा, मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indrajeet Sawant: देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
पुण्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना; अजित पवारांची सूचना
पुण्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना; अजित पवारांची सूचना
Ranveer Allahbadia Statement Controversy Case: माझ्याकडून चूक झाली... सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून 'त्या' गुन्ह्याची कबुली; म्हणाला...
माझ्याकडून चूक झाली... सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून 'त्या' गुन्ह्याची कबुली; म्हणाला...
कांदा प्रश्न पेटला! निर्यात शुल्क हटवा, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
कांदा प्रश्न पेटला! निर्यात शुल्क हटवा, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
Nashik Prajakta Mali Mahashivratra Program: त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र
Nashik Crime : नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
10 वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी, 2 शिक्षकांसह मुख्याध्यापिका अडकल्या; व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल
10 वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी, 2 शिक्षकांसह मुख्याध्यापिका अडकल्या; व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल
Nashik Accident : दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Embed widget