Panchayat 2 : 'पंचायत'ची रिंकी खूपच साधीभोळी; खऱ्या आयुष्यात सान्विका मात्र बोल्ड
Panchayat 2 : 'पंचायत 2' या वेब सीरिजमधील रिंकी म्हणजे सान्विका आयुष्यात खूपच बोल्ड आहे.
Panchayat 2 : 'पंचायत 2' (Panchayat 2) या वेबसीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. पंचायतचा दुसरा सीझनदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या वेब सीरिजमधील सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या वेब सीरिजमध्ये सरपंचांची मुलगी रिंकी उर्फ सान्विकाच्या Sanvikaa अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
सान्विकाचा रॉकिंग अंदाज
'पंचायत' सीझनच्या पहिल्या भागात सान्विकाची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्यामुळे प्रेक्षक जितेंद्र कुमार आणि रिंकीच्या प्रेमकथेची प्रतीक्षा करत होते. 'पंचायत'च्या दुसऱ्या सीझनमध्ये मात्र प्रेक्षकांना त्यांची लव्हस्टोरी पाहायला मिळाली. या वेबसीरिजमध्ये रिंकी खूपच साधीभोळी दाखवण्यात आली आहे. पण सान्विका मात्र खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
सोशल मीडियावर सान्विका अॅक्टिव्ह
सान्विका सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. सान्विकाचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. सान्विका तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सान्विकाच्या रिंकी या पात्राने प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. सान्विकाचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
View this post on Instagram
'पंचायत 2' प्रेक्षकांच्या पसंतीस
गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 'पंचायत’ या सीरीजचा पहिला सीझन रिलीज झाला होता. लॉकडाऊन दरम्यान या वेब सीरीजने लोकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या वेब सीरीजची कथा आणि आशय लोकांना खूप आवडला होता. पहिल्या सीझनमध्ये इंजिनीअरिंग केलेला अभिषेक त्रिपाठी ‘पंचायत सचिव’ म्हणून फुलेरा गावात येतो, पण इथली परिस्थिती पाहून पहिल्याच दिवशी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतो. अशा परिस्थितीत, तो एमबीए करण्यासाठी कॅट परीक्षा देण्याचा विचार करतो आणि त्यात यशस्वी होऊ शकत नाही. ‘पंचायत’ या वेब सीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये एकूण आठ भाग आहेत. ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या