OTT Release This Week : 'तू झूठी मैं मक्कार' ते 'विक्रम वेधा'; 'या' प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
OTT Release This Week : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.
OTT Release This Week : मे (May) महिन्याचा पहिला आठवडा खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. अॅक्शन, रोमान्स, विनोद अशा वेगवेगळ्या जॉनरच्या कलाकृती या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkar) या सिनेमासह 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) पर्यंत या सिनेमाचा समावेश आहे.
सास बहू और फ्लेमिंगो (Saas Bahu Aur Flamingo) : 'सास बहू और फ्लेमिंगो' ही वेबसीरिज आज (5 मे 2023) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये डिंपल कपाडिया, राधिका मदान आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत आहे. होमी अदजानियाने दिग्दर्शित ही सीरिज प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkar) : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा रोमॅंटिक सिनेमा आता ओटीटीवर प्रेक्षक पाहू शकतात. या सिनेमातील रणबीर-श्रद्धाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रेक्षक पाहू शकतात.
They're running to you to let you know that #TuJhoothiMaiMakkaar is now streaming! 🥳 pic.twitter.com/bfTj7JtyvD
— Netflix India (@NetflixIndia) May 3, 2023
द टेलर (The Tailor) : 'द टेलर' हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
सिटाडेल (Citadel) : प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडनची थरार-नाट्य असणारी 'सिटाडेल' ही सीरिज प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. आतापर्यंत या सीरिजचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सीरिजमधील प्रियांकाचा अॅक्शन मोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
विक्रम वेधा (Vikram Vedha) : बॉलिवूड अभिनेता ऋतिष रोशन आणि सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' हा सिनेमा प्रेक्षकांना जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. 8 मे 2023 रोजी हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.
The trio that will leave you in awe! 🤩🔥
— prime video IN (@PrimeVideoIN) May 1, 2023
watch #CitadelOnPrime now, if you haven’t already
Available in English, Hindi, Tamil, Telugu, Kannada & Malayalam pic.twitter.com/VcEcor6Iw6
संबंधित बातम्या