Oscars Awards 2023 : व्हाऊचर्स, चॉकलेट्स, मिठाई अन्...; ऑस्कर पुरस्कार विजेत्याला देण्यात येणारं गिफ्ट हॅम्पर असतं लाखो डॉलर्सचं
Oscars 2023 : ऑस्कर पुरस्कार विजेत्याला देण्यात येणाऱ्या गिफ्ट हॅम्परची किंमत लाखो डॉलर्स आहे.
Oscars Awards 2023 Gift Hamper : हॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) सोहळा आज पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात 'द एलिफंट व्हिस्परर्स' या भारतीय डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मने आणि राजामौली यांच्या बहुचर्चित 'आरआरआर' या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने भारतासाठी ऑस्कर पटकावला आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना एक खास गिफ्ट हॅम्पर दिलं जातं. दरवर्षी हे गिफ्ट हॅम्पर सिनेप्रेमींचं लक्ष वेधून घेतं. या गिफ्ट हॅम्परमध्ये नक्की काय असतं याची सिनेरसिकांना उत्सुकता असते. ऑस्कर पुरस्कार विजेत्याला देण्यात येणाऱ्या गिफ्ट हॅम्परची किंमत लाखो डॉलर्स आहे.
गिफ्ट हॅम्परची किंमत किती आहे? (Oscar Gift Hamper Price)
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान लॉस एंजलिस येथील 'डिस्टिंक्टिव्ह असेट्स' ही कंपनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांना गिफ्ट हॅम्पर देत आहे. 2002 पासून ही कंपनी विजेत्यांना गिफ्ट हॅम्पर देत आहे. यावर्षी देण्यात आलेल्या गिफ्ट हॅम्परची किंमत 1 लाख 26 हजार डॉलर्स आहे.
गिफ्ट हॅम्परमध्ये काय असतं?
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान विजेत्यांना देण्यात आलेल्या गिफ्ट हॅम्परमध्ये 60 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. विविध खाद्यपदार्थ, चॉकलेट्स, मिठाई, गिफ्ट व्हाऊचर्स, सौंदर्यप्रसाधने, पेटा ब्रॅंडची ऊशी, अनेक ब्रॅंड्सच्या प्रॉडक्टवर डिस्काउंट ऑफर, ऑस्ट्रेलियाची मोफत ट्रिप, कॅनडाच्या आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची संधी असा अनेक गोष्टींचा या गिफ्ट हॅम्परमध्ये समावेश आहे.
View this post on Instagram
गिफ्ट हॅम्पर कोणाला मिळालं?
गिफ्ट हॅप्मर ऑस्करचे सूत्रसंचालक जिमी किमेल, सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला ब्रेंडन फ्रेझर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिशेल योह, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री यांना मिळालं आहे.
ऑस्करच्या शर्यतीतून भारताची 'All That Breathes' बाहेर
ऑस्करच्या शर्यतीतून भारताचा 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) हा माहितीपट बाहेर पडला आहे. ऑस्कर पुरस्कार 'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीत 'नवाल्नी'ने (Navalny) ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत 'ऑल दॅट ब्रीथ्स'या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले आहे.
संबंधित बातम्या