एकेकाळी मिस वर्ल्ड जिंकली, ऐश्वर्या -सुष्मिताशी व्हायची तुलना, बॉलीवूडची पहिलीच फिल्म आपटली अन् अभिनेत्रीचं बदललं आयुष्य
ती आपल्या फ्लॉप करिअरबद्दल आजही बिनधास्त बोलते ,“मी तीन फ्लॉप चित्रपट केले, पण मला त्याची लाज नाही. कदाचित बॉलिवूड माझ्यासाठी नव्हतंच,” असं ती स्पष्टपणे सांगते.

Bollywood: एकेकाळी ‘जगातली सर्वात सुंदर मुलगी’ म्हणून ओळखली जाणारी युक्ता मुखीची (Yukta Mukhi) तुलना नेहमीच सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्याशी केली जाते. पण ऐश्वर्या आणि सुष्मिता यांनी ज्या उंचीवर आपलं नाव पोहोचवलं, तिथपर्यंत युक्ता पोहोचू शकली नाही. तरीही, ती आपल्या फ्लॉप करिअरबद्दल आजही बिनधास्त बोलते ,“मी तीन फ्लॉप चित्रपट केले, पण मला त्याची लाज नाही. कदाचित बॉलिवूड माझ्यासाठी नव्हतंच,” असं ती स्पष्टपणे सांगते. (Bollywood News)
युक्ताचा बॉलिवूड प्रवास आणि अपयश
युक्ता मुखीने 1999 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारताचा झेंडा उंचावला होता. त्यानंतर 2002 मध्ये तिला ‘प्यासा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतरच्या दोन चित्रपटांनाही प्रतिसाद मिळाला नाही. “जेव्हा आपण नवीन असतो, तेव्हा आपल्याला पाठिंबा लागतो. पण माझं अनुभव सुखद नव्हतं,” असं ती सांगते.
शाळा आणि महाविद्यालयीन काळात मी दररोज तिथे जायचो आणि नंतर महाविद्यालयीन वादविवादांमध्ये भाग घेऊ लागलो. माझ्या मैत्रिणींनी मला सांगितले की मी सुंदर आहे आणि माझी उंची चांगली आहे, म्हणून मी मॉडेलिंग, मिस इंडिया आणि मिस वर्ल्डचा प्रयत्न केला पाहिजे. तिथून माझा मॉडेलिंग प्रवास सुरू झाला.
अध्यात्माकडे वाढता कल
बॉलिवूडमधील अपयशानंतर युक्ता मुखी पूर्णपणे अध्यात्माकडे वळली. तिचं म्हणणं आहे, “मी लहानपणापासून माझ्या आजीबरोबर सत्संगाला जायची. तेव्हाच मला त्या वातावरणाची ओढ लागली.” आज युक्ता मुखी मुंबईतील विविध आश्रमांशी जोडलेली आहे आणि अध्यात्मिक जीवन जगते.
वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार
युक्ताने 2008 साली व्यवसायिक प्रिन्स तुली यांच्याशी विवाह केला होता. पण अवघ्या सहा वर्षांनी त्यांचं नातं तुटलं आणि दोघांनी घटस्फोट घेतला. आज युक्ता मुखी 48 वर्षांची असून शांत, साध्या आयुष्यात समाधानी आयुष्य जगतेय.
पाकिस्तानशी जोडलेलं नातं
युक्ताने सांगितलं की, तिच्या वडिलांचं मूळ पाकिस्तानच्या मुलतान शहराशी आहे. भारत-पाक फाळणीनंतर तिचे वडील भारतात आले आणि रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहिले. मात्र, जेव्हा कोणी तिच्या मूळ गावाबद्दल विचारतं, तेव्हा ती नेहमीच अभिमानाने म्हणते, “मी मुंबईचीच आहे.”























