OMG 2 OTT Release: अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा 'ओएमजी-2' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या
OMG 2 OTT Release: ओएमजी-2 हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात....
OMG 2 OTT Release: अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या ओएमजी-2 (OMG 2) या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ओएमजी-2 हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात....
ओएमजी-2 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओएमजी-2 हा चित्रपट रिलीज होणार आहे. नुकतीच नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ;आम्ही तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन आलो आहोत. OMG तुम्ही सांगू शकता की, आम्ही टू एक्सायटेड आहोत?' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओएमजी-2 हा चित्रपट 8 ऑक्टोबर रोजी स्ट्रीम केला जाणार आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते आता नेटफ्लिक्सवर घरबल्या हा चित्रपट पाहू शकणार आहेत.
ओएमजी-2 या चित्रपटासोबतच 'गदर 2' हा चित्रपट देखील 11 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमारचा ओएमजी-2 हा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांनी ओएमजी-2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी कांती शरण मुद्गल यांची भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
अक्षयचे आगामी चित्रपट
अक्षय कुमारचे वेलकम टू द जंगल आणि 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. वेलकम टू द जंगल हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. तर 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' या चित्रपटाची कथा 1998 मधील घडलेल्या घटनेवर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :
Akshay Kumar : अक्षय कुमारने 'OMG 2' सिनेमासाठी एकही रुपये घेतला नाही; निर्मात्यांची माहिती