एक्स्प्लोर

6 वक्तव्य, ज्यामुळे ओम पुरी वादात अडकले!

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे  होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ओम पुरी यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अखेरच्या काळात ओम पुरी अनेक वादात अडकले. काही कौटुंबीक तर काही सामाजिक वाद होते. ओम पुरी यांची वादग्रस्त वक्तव्य 1) उरी हल्ल्यानंतर एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात चर्चा करताना, ओम पुरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "जवान शहीद होतात तर त्यांना सैन्य दलात भरती व्हायला कोणी सांगितलं, हातात बंदूक घ्यायला कोणी सांगितलं", असं ओम पुरी म्हणाले होते. त्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल झाला होता. मात्र ओम पुरी यांनी या वक्तव्याबद्दल ओम पुरींनी उत्तरप्रदेशमधील इटावाच्या शहीद जवान नितीन यादव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली होती. 2) आण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावरील उपोषणावेळी ओम पुरी यांनी त्यांच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी ओम पुरी यांनी राजकीय नेत्यांवर सडेतोड भाषेत टीका केली होती. "आयएएस, आयपीएस अधिकारी अंगठेबहाद्दर नेत्यांना सलाम ठोकतात तेव्हा मला लाज वाटते. या अंगठेबहाद्दरांची पार्श्वभूमी काय? अर्ध्याहून अधिक खासदार अडाणी आहेत" असं ओम पुरी म्हणाले होते. मात्र वाद उफाळल्यानंतर ओम पुरी यांनी माफी मागत, मी संसद आणि संविधानाचा आदर राखतो, मला भारतीय असल्याचा गर्व आहे असं म्हटलं होतं. 3) आमीर खानने कथितरित्या असहिष्णुतेबाबत वक्तव्य केलं होतं. पत्नी किरणने देश सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असं आमीर म्हणाला होता. यावर ओम पुरी म्हणाले होते, "आमीर आणि त्याची पत्नी असा विचार करु शकतात हे ऐकून मी हैराण झालो. असहिष्णुतेबाबत आमीर खानचं वक्तव्य सहन करण्यासारखं नाही. आमीरचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे. असं वक्तव्य करुन तुम्ही तुमच्या समुदायाला भडकवत आहात, की तयार राहा, लढा किंवा देश सोडा" 4) गोहत्याबाबत उफाळलेल्या वादाबाबतही ओम पुरी यांनी वक्तव्य केलं होतं. "ज्या देशात बीफ निर्यात करुन डॉलर कमावले जातात, तिथे गोहत्याबंदी हा पाखंडीपणा आहे", असं ओम पुरी म्हणाले होते. 5) नक्षलवाद्यांबाबत ओम पुरी म्हणाले होते, "नक्षलवादी हे दहशतवादी नव्हे तर फायटर आहेत. ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. नक्षलवादी सामान्य माणसाला त्रास देत नाहीत" 6) ओम पुरींनी पंतप्रधान मोदींबाबतही वक्तव्य केलं होतं. "सध्या आपल्याकडे मोदींच्या कडेवर बसण्याशिवाय पर्याय नाही. कारण यापूर्वी आपण अन्य लोकांच्या कडेवर बसून अनुभव घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Fadnavis On Swara Bhaskar Jauhar Controversy: 'मला उत्तर द्यायचं नाहीये, पण...', स्वरा भास्करच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर थेटच बोलल्या अमृता फडणवीस, प्रकरण नेमकं काय?
'मला उत्तर द्यायचं नाहीये, पण...', स्वरा भास्करच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर थेटच बोलल्या अमृता फडणवीस
Ameesha Patel On Hardik Pandya: 'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
Hanuman Ansh Box Office Collection: ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
Actress And Influencer Jail Experience: 'मला 27वेळा विवस्त्र केलंय, नको तिथे स्पर्श करुन तपासलंय अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तुरूंगातील भयंकर अनुभव
'मला 27वेळा विवस्त्र केलंय, नको तिथे स्पर्श करुन तपासलंय अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तुरूंगातील भयंकर अनुभव

व्हिडीओ

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
Embed widget