एक्स्प्लोर

'सैराट' आता तेलुगूतही, दमदार कामगिरी सुरुच; कमाईत नवा उच्चांक

मुंबई: मराठीत दमदार कामगिरी करणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमा 'सैराट' आता लवकरच तेलुगूमध्येही येणार आहे. तसेच मराठी सिनेसृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘सैराट’ने नवा उच्चांक गाठला आहे. सैराटनं आतापर्यंत 85 कोटींची कमाई केली आहे.   या सिनेमाचं नागराज मंजुळे हे स्वत: दिग्दर्शन करणार आहेत. अवघ्या महाराष्ट्राला 'झिंगाट' करुन सोडणारा हा सिनेमा दक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल टाकणार आहे. मराठीत या सिनेमानं आतापर्यंत 85 कोटींची कमाई केली असून अजूनही मोजणी सुरुच आहे. हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करेल असा अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे.   सैराट हा सिनेमा 29 एप्रिलला सर्वत्र रिलीज झाला. महाराष्ट्रासह देशभरातून आर्ची-परशा यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी अक्षरश: जीव ओवाळून टाकला. सैराट चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात पायरसीचा फटका बसूनही, अनेक चाहत्यांनी थिएटर्समध्ये जाऊनच हा सिनेमा पाहणं पसंत केलं. त्यामुळेच या सिनेमाने ही ऐतिहासिक कमाई केली आहे.   29 एप्रिल रोजी ‘सैराट’राज्यभरातील 400 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो 8500 ते 14,000 पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री 12 आणि पहाटे 3 चा शोही सुरु होता. ‘सैराट’चं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं.   ‘सैराट’मधील लंगड्या कोणाची झेरॉक्स मारणार?   ‘सैराट’ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4.85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई 15.10 कोटी रुपयांवर गेली.   यापूर्वी ‘नटसम्राट’ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा ‘नटसम्राट’ 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या 10 दिवसांतच पार केला.   VIDEO : ‘झिंगाट’वर माधुरी, रितेश आणि अक्षय ‘सैराट’   दुसरीकडे ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.   लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता. तर रवी जाधव यांच्या टाईपमास- 2 ने पहिल्या 3 दिवसांमध्ये तब्बल 11 कोटी रुपयांची कमाई केली होती.   मराठी सिनेमांची कमाई   यापूर्वी ‘दुनियादारी’ या सिनेमाने 26 कोटी कमावून, मराठी सिनेमाच्या कमाईचा ट्रेण्ड तयार केला होता. मग ‘टाईमपास’ या सिनेमाने त्यापुढे मजल मारून 32 कोटींची कमाई केली. याशिवाय ‘टाईमपास 2’नेही 28 कोटी कमावले होते. मात्र ‘लय भारी’ सिनेमाने तब्बल 38 कोटींचा गल्ला जमवून, मराठी सिनेसृष्टीत कमाईचा विक्रम प्रस्थापित केला होता.   मराठी सिनेमांची भरारी   *दुनियादारी : 26 कोटी *टाईमपास – 32 कोटी *टाईमपास 2 – 28 कोटी *लय भारी – 38 कोटी * नटसम्राट – 40 कोटी *कट्यार काळजात घुसली – 31 कोटी  

संबंधित बातम्या :

कानडी प्रेक्षकही आर्ची-परशाच्या प्रेमात, विजापुरात सैराट हाऊसफुल…

सिनेमा पाहिला, नेटवर अर्थ शोधला… अन् मुलाचं नाव ठेवलं…

‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, आर्ची-परशाला बंपर बोनस?

‘सैराट’ चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला

आर्ची-परशा आता गुजराती-तेलुगूत, ‘सैराट’चा लवकरच रिमेक

आर्ची-परशाचं खरं फेसबुक पेज कोणतं?

नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय

‘सैराट’नं रचला इतिहास… तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!

‘सैराट’च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’कडून दखल

‘त्या’ संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस

इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, ‘सैराट’ टीमला…

आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात

रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अँबेसेडर?

नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन

डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न…..

‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात ‘नटसम्राट’ला धोबीपछाड

“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”

सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?

“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”

सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार

रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget