Nitin Desai : भव्यदिव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक नितीन देसाई कोण होते? नरेंद्र मोदींनीही केलं होतं कौतुक
Nitin Desai : नितीन देसाई यांनी वयाच्या 58 व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं.
Nitin Desai : कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी वयाच्या 58 व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई हे कला दिग्दर्शक असण्यासोबत अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकही होते. अनेक सुपरहिट सिनेमांच्या यशात नितीन देसाई यांचा मोलाचा वाटा आहे.
Nitin Desai : दापोलीत जन्म, मुंबईत शिक्षण, लगान ते जोधा अकबर, डोळे दिपवणारे सेट उभारले; कोण होते नितीन देसाई?
नितीन देसाई यांचा जन्म दापोलीत 9 ऑगस्ट 1965 रोजी झाला. लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत ते निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेही होते. अनेक सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. अनेक लोकप्रिय सिनेमांच्या निर्मितीत त्यांचं मोलाचं योगदान होतं. नितीन देसाई यांचं संपूर्ण नाव नितीन चंद्रकांत देसाई.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Nitin Desai Suicide: नितीन देसाई यांचे काम पाहून थक्क झाले होते नरेंद्र मोदी; स्वत: फोन करुन केलं होतं कौतुक
Nitin Desai Suicide: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन देसाई यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक किस्सा सांगितला होता.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Nitin Desai : आलिशान ND Studio; गड-किल्ले, राजवाड्यांचे सेट्स... डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओबद्दल जाणून घ्या...
Nitin Desai ND Studio : नितीन देसाई (Nitin Desai) यांनी अनेक सुपरहिट सिनेमांचं कला दिग्दर्शन करण्यासोबत एन. डी स्टुडिओची (ND Studio) निर्मितीदेखील केली आहे. नितीन देसाई यांनी मराठी-हिंदीसह हॉलिवूडच्या सिनेमांचे सेटही उभारले आहेत. रोमांच, गड-किल्ल्यांचे सेट्स, बंगले, राजवाडे असे डोळे दिपवणारे अनेक सिनेमांचे, कार्यक्रमांचे सेट्स नितीन देसाई यांनी त्यांच्या एन.डी स्टुडिओमध्ये उभारले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
View this post on Instagram
Nitin Desai : आयुष्याच्या सेटवरुन एक्झिट! जगाचा सेट जिथे उभारला त्याच रंगमंचावर संपवली जीवन यात्रा; उद्या होणार अंत्यसंस्कार
Nitin Desai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये (ND Studio) गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. त्यांनी जीवन यात्रा संपवल्यामुळे मराठी हिंदी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. 'देवदास','लगान' अशा अनेक सुपरहिट सिनेमांचं कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Nitin Desai : लालबागच्या राजा आणि एनडी यांचं खास नातं; यंदाही राजाच्या मुख्य मंडपाची सजावट नितीन देसाईंकडून पूर्ण
Nitin Desai Lalbaugcha Raja : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गणपती बाप्पावर अतीव श्रद्धा होती. त्यात दरवर्षी ते लालबागच्या राजाचा सेट तयार करायचे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या गणेश विसर्जनावेळी त्यांची उपस्थिती बघायला मिळायची. यंदाही लालबागच्या राजाच्या मुख्य मंडपाची सजावट त्यांनी पूर्ण केली.