Heropanti 2: Heropanti 2 साठी Nawazzudin Siddqui करणार Vinod Khanna ची नक्कल
हिरोपंती 2 मधील भूमिकेसाठी ननाजुद्दीन सिद्दीकी करणार विनोद खन्नांच्या चालीची नक्कल
Heropanti 2: ननाजुद्दीन सिद्दीकी यांनी हिरोपंती 2 मधील भूमिकेसाठी काम सुरू केले आहे. या भूमिकेसाठी ते विनोद खन्नांच्या भूमिकेची नक्कल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकेकाळी विनोद खन्ना प्रचंड नावाजलेले कलाकार होते. विनोद खन्ना अभिनयात सरस होतेच पण त्यासोबत त्या काळच्या कलाकारांमध्ये दिसण्यातही विनोद खन्ना वरचढ होते. 70-80 च्या दशकातील त्यांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते. दरम्यान चाहत्यांच्या मनावरही त्यांनी राज्य केले होते. त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त ते ओळखले गेले ते त्यांच्या चालण्याने. इंडस्ट्रीत त्यांच्या चालण्याच्या पद्धतीला 'वाघाची चाल' असे संबोधले जायचे. अमिताभ बच्चनदेखील एकदा म्हणाले होते, विनोद खन्ना ज्यापद्धतीने चालतात तसे कोणीही चालत नाही. पण आता नवाजुद्दीन त्यांच्या चालीची नक्कल करणार आहेत.
हिरोपंती 2 मध्ये करणार विनोद खन्नांच्या चालीची नक्कल
नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच हिरोपंती 2 मध्ये दिसून येणार आहेत. नवाजुद्दीनने विनोद खन्नांच्या चालीची नक्कल करण्याचा चंगच बांधला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची आजच्या कोणत्याच कलाकारासोबत तुलना होऊ शकत नाही. एखादी भूमिका मिळाल्यानंतर ते त्या भूमिकेचा अभ्यास करतात. याआधी त्यांनी अनेक अभिनेत्यांची नक्कल केलेली आहे. त्यांनी मनोज वाजपेयींची नक्कल केली होती त्यावेळी त्यांच्या कामाचे चाहत्यांनी कौतुक केले होते.
नवाजचे काय आहे म्हणणे?
नवाजची नेहमी खास लोकांवर नजर असते. अशा लोकांना ते लक्षातदेखील ठेवतात. हिरोपंती 2 मध्ये त्यांनी विनोद खन्नाच्या चालीची नक्कल करण्याचादेखील प्रयत्न केला आहे. मला त्यांचा अभिनेता म्हणून आदर आहेच. पण त्यांचे व्यक्तिमत्तव, स्वभाव, शैलीदेखील भावते. त्यांचा एक वेगळाच स्वॅग आहे. त्यांच्या चालीत असणारा महिलांसारख्या ग्रेसची नक्कल हिरोपंतीमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. या चालीची नक्कल करणयाआधी नवाज आणि अहमद भाई यांनी चर्चा केली होती. मग या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.