Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रिन; आगामी प्रोजेक्टची केली घोषणा
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन हा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या प्रोजेक्टमध्ये तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता नवाजुद्दीन हा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रिन
नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रिया बापट 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत आगामी प्रोजेक्टमध्ये स्क्रिन शेअर करणार आहे. नुकतीच नवाजुद्दीन आणि प्रिया बापटच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. बीएसएल फिल्म्स या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकतेच काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये प्रिया आणि नवाजुद्दीन दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, "तारे अक्षरशः चमकत आहेत! प्रिया बापट आल्यामुळे आमचे कुटुंब मोठे झाले, कारण ती नवाझुद्दीन सिद्दीकी सोबत आमच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे." आता प्रिया आणि नवाजुद्दीन यांचा हा आगामी प्रोजेक्ट चित्रपट असणार की वेब सीरिज? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.नवाजुद्दीन सिद्दीकीनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
View this post on Instagram
नवाजुद्दीनचे चित्रपट
गँग ऑफ वासेपूर, मंटो, ठाकरे, 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांना नवाजुद्दीन सिद्दीकीनं काम केलं. नवाजुद्दीनचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. काही दिवसांपूर्वी त्याचा हड्डी हा चित्रपट रिलीज झाला होता.
प्रियाचे चित्रपट
प्रिया ही चित्रपट, नाटक आणि वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या हिंदी चित्रपटामध्ये प्रियानं काम केलं. तसेच प्रियाचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग केवळ पुण्यात आणि मुंबईत नाही तर परदेशात देखील पार पडले. आता प्रियाच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या: