एक्स्प्लोर
नाना पाटेकर यांना मातृशोक, निर्मला पाटेकर यांचं निधन
त्या 99 वर्षांच्या होत्या. सायंकाळी 5.30 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी नाना पाटेकर यांच्यासह त्यांचे काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या मातोश्री निर्मला पाटेकर यांचं आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या 99 वर्षांच्या होत्या. सायंकाळी 5.30 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी नाना पाटेकर यांच्यासह त्यांचे काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
ज्यावेळी त्यांच्या आईंनी शेवटचा श्वास घेतला त्यावेळी ते घरी नव्हते. त्यांना माहिती मिळताच ते घरी पोहोचले. नानांचं आपल्या आईसोबत घट्ट नातं होतं. त्यांनी वेळोवेळी याबद्दल सांगितलं आहे.
नाना 28 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील गजानन पाटेकर यांचं निधन झालं होतं. ते मुंबईत टेक्सटाईलचं व्यवसाय करत होते. तर नाना आपल्या आईंसोबत गावी राहत होते. गजानन पाटेकर आणि निर्मला पाटेकर यांना 7 मुलं होती. मात्र पाच मुलांचं लहान असतानाचं निधन झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement