एक्स्प्लोर
Advertisement
55 टक्के शेतकरी आहेत, एकत्र झाले तर काय होईल?: नाना पाटेकर
मुंबई: राज्यात शेतकरी संप सुरु आहे. राज्यातील आजच्या या संपूर्ण परिस्थितीवर अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. पाहा 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत काय म्हणाले नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे?
प्रश्न: नाना शेतकरी संपाच्या घटनेकडे तुम्ही कशाप्रकारे बघता?
उत्तर (नाना पाटेकर): हे दुर्दैव आहे की, शेतकऱ्यांना संपावर जावं लागतं. यापेक्षा कोणतीही दुर्दैवी घटना नाही. असं कोणत्याही राष्ट्रात घडू नये. कारण की, हा आपला अन्नदाता आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यानिमित्तानं शेतकरी संघटीत होत आहे. ही त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची बाब. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आमचा शेतकरी संघटीतच झाला नाही. झाला नाही आणि राज्यकर्त्यांनी होऊही दिलं नाही. त्यातील महत्वाची माणसं फोडली. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचं मी म्हणतो. त्यानंतर ती संघटना खिळखिळी होते. त्यानंतर त्या संघटनेला पुन्हा बळकटी यायला बरीच वर्ष जातात. असं हे वारंवार होतं. दलित चळवळीचं तसंच झालं. मला असं वाटतं की, शेतकऱ्यांच्या हे आतापर्यंत लक्षात यायला पाहिजे की, त्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. आज ते संघटित आहेत म्हणून त्यांच्या काही तरी मागण्या तरी मान्य होतील. शासकीय कर्मचारी दोन टक्के आहेत. पण ते संघटित असल्यानं त्यांच्या मागण्या मान्य होतात. आणि उगाच सवतेसुभे उभे करु नयेत. माझी संघटना, तुझी संघटना याची संघटना.. सगळ्यांनी एकत्र मिळून काम करावं.
55 टक्के शेतकरी आहे. एकत्र झालं तर काय होईल? माझं म्हणणं तेच आहे की, संघटित व्हा, मग लढता येईल. पण त्याला कुठलंही हिंसक स्वरुप येता कामा नये. हे सगळं होतं असताना काही राजकीय पक्ष असतील त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करतील. पण ते प्रत्येक गोष्टीत होतंच. त्यावेळी शेतकऱ्यांनी स्वत:ची बुद्धी वापरुन हे ठरवावं की, कोण खरी आई, मावशी आणि कोण पुतना मावशी आहे.
प्रश्न: राजकारण होतं आहे असं वाटतं का? सरकार आरोप करत आहे की, जे आंदोलन करत आहेत ते शेतकरी नाहीत.
उत्तर (मकरंद अनासपुरे) : मुळात मला असं वाटतं की, शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन विचार करणं गरजेचं आहे. आत्ताच नाना म्हणाले की, मावशी कोण पुतना मावशी कोण? हे शेतकऱ्यांनाच ठरवावं लागेल. 55 टक्के एवढे शेतकरी बांधव आहेत. सर्व एकत्र आले तर स्वत:च्या प्रश्नांची उत्तरं फार सफल पद्धतीनं शोधू शकतील.
प्रश्न: शेतकऱ्यांना आपलं रक्त सांडावं लागलं, मध्यप्रदेशात गोळीबार झाला, महाराष्ट्रातही एका शेतकऱ्याचा या आंदोलनादरम्यान, हृदयविकारानं निधन झालं.
उत्तर (नाना पाटेकर): वाईट आहे, कोणीही मरणं... आणि अशा मुलभूत गोष्टीसाठी मागणी मांडत असताना असं होणं वाईट आहे. दोन्ही बाजूनं असं म्हटलं जात आहे की, नाही आम्ही गोळीबार केलाच नाही असं मध्यप्रदेश सरकार किंवा पोलीस खात्याचं म्हणणं आहे. पण प्रत्येक जण आपआपली बाजू त्यांच्या-त्यांच्या पद्धतीनं मांडत राहणार. खरं काय खोटं काय? आम्ही काय निवांत... मध्यमवर्ग म्हणून आम्ही टीव्हीसमोर बसलेलो असतो. त्या क्षणाला आम्ही लावलेली बातमीच आम्हाला खरी वाटते.
तेव्हा आम्ही म्हणतो. अरेरे हे चाललं आहे... अरे बापरे हे सुरु आहे. मग राग येतो, उद्विग्न होतो. वाईट वाटतं. हे तेवढंच होतं. त्यानंतर आम्हाला आमची सुख दु:ख आहेत. पुन्हा आम्ही विसरतो पुन्हा जातो. संध्याकाळी आम्ही विचारतो. 'अगं, काय गं काय झालं ते शेतकरी संपाचं.' इतकं तिऱ्हाईतपणे पाहावं लागतं. मला वाटतं आपण आपल्या एकमेकांच्या सुखदु:खाशी निगडीत व्हायला पाहिजे. याचं काय दुखत असेल तर मी त्याच्या बाजूला बसणं, मी तिथं जाऊन उगाच क्रिकेट खेळायला जायचं नाही. काय हवंय का मक्या, मी आहे काळजी नको करु. ताप असेल तर त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवा. तेवढ्या पुरतंच असतं ते, कायमस्वरुपी नसतं. त्या तेवढ्या वेळेल्या तुम्ही त्या माणसाच्या बरोबर असणं गरजेचं आहे.
प्रश्न: आंदोलन हिंसक झालं, गाड्या फोडण्यात आल्या, दुधाचे टँकर रस्त्यावर रिकामे झाले?
उत्तर (मकरंद अनासपुरे) : एका वर्षापूर्वी नानांनी सांगितलं की, सगळ्यांचीच मानसिकता आत्महत्याची असू शकतं नाही. काही जण वेगळ्या पद्धतीनं रिअॅक्ट होतील. काही जण सकारात्मक रिअॅक्ट होतील काही जण नकारात्मक रिअॅक्ट होतील. हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे. एवढं साधं आहे त्यात.
प्रश्न: नाम फाऊंडेशन आणि एक सजग नागरिक सरकारकडे काही विनंती करणार का?
उत्तर (नाना पाटेकर): काही नाही, त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मान्य करा. ज्या अवाजवी वाटतात त्यावर चर्चा करा. कशी कर्जमाफी करायची त्यावर भाष्य करण्याइतकी ताकद माझी नाही. मी काही अर्थतज्ज्ञ नाही. पण माझ्या या गरीब भावंडांना जे त्यांचं आहे ते मिळालंच पाहिजे.
(मकरंद अनासपुरे): सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी हिताचं जे-जे काही असेल त्या सगळ्याला नाम फाऊंडेशनचा बिनशर्त पाठिंबा आहे.
VIDEO:
संबंधित बातम्या:
भाजप नेते शेतकऱ्यांच्या रडारवर, मंत्र्यांच्या घराबाहेर पहारा
कर्जमाफीसाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचं मुंडन
शेतकरी संपावर : संपाचा सातवा दिवस, सरकारविरोधात आज मौन आंदोलन
शेतकरी आंदोलन जितकं दाबाल, तितकं उफाळून येईल: नाना पाटेकर
LIVE UPDATE : दिवस सातवा, बळीराजाचा संप सुरुच
''शेतकरी संपात अटक झालेल्यांमध्ये निम्मे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते''अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement