एक्स्प्लोर
Advertisement
शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज
अन्न सुरक्षा योजनेची गरज नसलेल्या नागरिकांनी या योजनेतून बाहेर पडावं, असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. त्याला प्रतिसाद देत नागराज मंजुळे यांनी स्वतःचं नाव रद्द करण्यासाठी अर्ज दिला.
सोलापूर : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा योजनेची गरज नसलेल्या नागरिकांनी या योजनेतून बाहेर पडावं, या आवाहनाला प्रतिसाद देत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी करमाळ्यात येऊन त्यांचं रेशन कार्ड रद्द केलं.
करमाळ्यातील तहसीलदार कार्यालयात येऊत संबंधित योजनेतून बाहेर पडण्याचा अर्ज नागराज मंजुळे यांनी दिला.
माझ्याकडे असणारी पिवळी शिधापत्रिका मी वापरत नाही. गरजूंना हे अन्न मिळावं म्हणून मी या योजनेतून बाहेर पडत असल्याचं नागराज मंजूळे यांनी सांगितलं. यावेळी करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार यांच्याकडे अर्ज भरुन देण्यात आला.
अन्न सुरक्षा आवश्यकतेची गरज नसलेल्या नागरिकांनी या योजनेतून बाहेर पडावं, असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement