एक्स्प्लोर

Mystery Thriller Web Series: महाराजा, दृश्यम सोडा... 'ही' साऊथची सीरिज एकदा पाहाच; आता OTT वर घालतेय धुमाकूळ

Mystery Thriller Web Series: 2024 मध्ये थिएटर्समध्ये एकापेक्षा एक असे धमाकेदार चित्रपट प्रदर्शित झालेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटांनी आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई करुन विक्रम मोडले आहेत.

Mystery Crime Thriller Web Series: विजय सेतुपतीचा 'महाराजा' (Maharaja) आणि अजय देवगण (Ajay Devgan) स्टारर 'दृश्यम' ओटीटीच्या सर्वात धमाकेदार फिल्म्सपैकी एक आहे. या फिल्ममध्ये दाखवण्यात आलेला सस्पेन्स एका मिनिटांत तुमचं डोकं भंडावून सोडेल. पण, आज आम्ही तुम्हाला 2 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका सीरिजबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये अप्रतिम सस्पेन्स पाहायला मिळेल. 

2024 मध्ये थिएटर्समध्ये एकापेक्षा एक असे धमाकेदार चित्रपट प्रदर्शित झालेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटांनी आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई करुन विक्रम मोडले आहेत. एवढंच नाहीतर थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हे चित्रपट ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहेत. आज आम्ही तुम्हाला एका वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, जिची कथा तुम्हाला पुरतं हादरवून सोडते. गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आणि मालिकांची क्रेझ झपाट्यानं वाढत आहे. आज 2022 मधल्या एका ब्लॉकबस्टर सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाबाबत सांगणार आहोत, जी ओटीटीवर रिलीज होताच लोकप्रिय झाली. कथेपासून क्लायमॅक्सपर्यंत या साऊथ मिस्ट्री क्राईम थ्रिलर वेब सीरिजबाबत सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे. आता सध्या हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. 

हादरवून सोडणाऱ्या 'या' वेब सीरिजचं नाव माहितीय? 

वेब सिरीजची कथा संबलूर या छोट्या काल्पनिक औद्योगिक शहरावर आधारित आहे. संबलूर हे इतर लहान शहरांसारखंच आहे, जिथे प्रत्येकजण सर्वांना ओळखतो आणि बहुतेक लोकांची उपजीविका इथल्या उद्योगाभोवती फिरते. आम्ही ज्या साऊथच्या सीरिजबाबत बोलत आहोत. त्याचं नाव आहे 'सुजल द व्होर्टेक्स'. ही एक तमिळ वेब सीरिज आहे. ज्यात कथिर, ऐश्वर्या राजेश, श्रिया रेड्डी आणि राधाकृष्णन पार्थिबन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'विक्रम वेध' फेम पुष्कर आणि गायत्री निर्मित 'सुजल द व्होर्टेक्स' ही वेब सिरीज मुकेश वड्डे (युसुफ हुसेन) आणि त्याचा मुलगा त्रिलोक वड्डे (हरीश उथमान) यांच्याभोवती फिरते, ज्यांचा सिमेंटचा मोठा कारखाना रात्रभर जळून खाक होतो. दरम्यान, लोकदेवता अनगलम्मनच्या सन्मानार्थ माया कोल्लईचा नऊ दिवसांचा उत्सव देखील संबलूरमध्ये सुरू होतो आणि इथून एक वेदनादायक आणि भयानक कथा सुरू होते, ज्याची कोणीही कल्पना केली नसेल.

कहाणी पाहून डोळे विस्फारतील... 

कथेतील अनेक दृश्य धक्कादायक आहेत. ज्या दिवशी कारखाना आगीत भस्मसात होतो, त्याच दिवशी शहरातील एक मुलगीही बेपत्ता होते. संपूर्ण कथेत एक सस्पेन्स आहे, जो लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. 8 भागांची क्राईम थ्रिलर वेब सिरीज 'सुजल द व्होर्टेक्स' अनुचरण आणि ब्रम्मा यांनी दिग्दर्शित केलेली आहे. तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. याला IMDB वर 10 पैकी 8.4 रेटिंग मिळालं आहे. 'सुजल'च्या सातव्या आणि आठव्या पर्वाचा 'टॉप रेटेड' यादीत समावेश करण्यात आला आहे. 'सुजल' हा तमिळ भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ 'वावटळ' आहे. त्याला इंग्रजी भाषेत 'व्हर्टेक्स' म्हणतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manjili Karad Beed PC : SIT, धस, बजरंग सोनवणेंवर आरोप;कराडच्या पत्नीनं सगळच सांगितलंWalmik Karad Wife Reaction : दोषी असतील तर कारवाई होईल, वाल्मिक कराडची पत्नी म्हणाली...Zero Hour Full | वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, इतक्यात तरी जामीन मिळणं अतिशय कठीणABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Embed widget