एक्स्प्लोर

Alia Bhatt : आलिया भट्टच्या घरातून लीक झालेल्या फोटोप्रकरणी मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमोडमध्ये; अभिनेत्रीशी साधला संपर्क

Alia Bhatt : आलिया भट्टच्या घरातून लीक झालेल्या छायाचित्र प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला तक्रार दाखल करण्यास सांगितलं आहे.

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. आलियाच्या लिव्हिंग रुममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला होता. पोस्ट शेअर करत तिने मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. आता पोलिसांनी आलियाशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. 

आलियाची पोस्ट काय आहे? (Alia Bhatt Post)

आलियाने संताप व्यक्त करत लिहिलं आहे, "मी माझ्या घरी लिव्हिंग रुममध्ये बसले होते. त्यावेळी कोणीतरी मला पाहतयं असं मला जाणवलं. मी खिडकीत येऊन पाहिल्यानंतर मला कळलं की, समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन फोटाग्राफर माझे फोटो काढत आहेत. एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणं किती योग्य आहे? मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत".

Alia Bhatt : आलिया भट्टच्या घरातून लीक झालेल्या फोटोप्रकरणी मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमोडमध्ये; अभिनेत्रीशी साधला संपर्क

आलियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पोस्ट शेअर करत तिने मुंबई पोलिसांनादेखील टॅग केलं आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी आलिया भट्टशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितलं आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "खार पोलिसांनी आलिया भट्टशी संपर्क साधला आहे. तसेच तिला सांगितलं आहे की, "फोटोग्राफरविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस याप्रकरणाची चौकशी करतील". 

आलियाच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहतेदेखील आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. आलियाची पीआर टीम आता फोटोग्राफरच्या शोधात आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी म्हटलं आहे, "लवकरच पोलिसांनी त्या फोटोग्राफरवर कारवाई करावी". अर्जुन कपूरने लिहिलं आहे की, "हे खूप लज्जास्पद आहे. सामान्य असो किंवा नामांकित आज महिला त्यांच्याच घरात सुरक्षित नाहीत. ही गंभीर बाब आहे". 

आलिया भट्टचे आगामी सिनेमे (Alia Bhatt Upcoming Movies)

आलिया भट्टचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तिचा 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart of Stone) हा हॉलिवूड सिनेमादेखील यावर्षीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dadasaheb Phalke Award 2023 : बॉलिवूडचं 'पॉवर कपल'; दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget