एक्स्प्लोर

Dadasaheb Phalke Award 2023 : बॉलिवूडचं 'पॉवर कपल'; दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Dadasaheb Phalke Award : मुंबईत नुकताच 'दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2023' पार पडला.

Dadasaheb Phalke Award 2023 : 'दादासाहेब फाळके पुरस्कार' (Dadasaheb Phalke Award 2023) हा सिनेविश्वातील महत्त्वाचा चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमातील भूमिकेसाठी तसेच सिनेविश्वातील योगदानासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 

आलिया भट्टने 'दादासाहेब फाळके पुरस्कार' सोहळ्यात हजेरी लावली होती. रणबीर कपूर आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर असल्याने तो या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नव्हता. त्यामुळे आलियाने रणबीरच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार  शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो.

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरचा बोलबाला!

आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमात तिने सेक्स वर्कर-माफिया डॉनची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. जगभरात तिची ही भूमिका प्रचंड गाजली. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित हा सिनेमा 2022 मध्ये सुपरहिट ठरला. त्यामुळे या सिनेमातील भूमिकेसाठी आलियाला दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरीकडे अर्यान मुखर्जी (Ayan Mukherji) दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात रणबीरने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. त्यामुळेच त्याला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. एकंदरीतच या पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. 

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि आलियाच्या फोटोंनी मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुरस्कार सोहळ्यात आलियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानदेखील आलियाने पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. तर पुरस्कार सोहळ्यात रेखाने सोनेरी रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती. 

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात 'या' सेलिब्रिटींची हजेरी

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक सेलिब्रिंटींनी हजेरी लावली होती. 

जाणून घ्या विजेत्यांची यादी...

सर्वोत्कृष्ट सिनेमा - द कश्मीर फाइल्स

सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आर बाल्की

सर्वोत्कृष्ट वेबसीरिज - रुद्र

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

कांतारा फेम ऋषभ शेट्टीचा डंका; दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्कार जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha  Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaGopal Shetty : बोरिवलीतून लढण्यावर गोपाळ शेट्टी ठामKshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget