एक्स्प्लोर
'मोहेंजोदरो' च्या एका सीनसाठी 300 जणांचं ऑडीशन
मुंबईः हृतिक रोशनचा 'मोहेंजोदरो' सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमातील एक सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी तब्बल 300 कलाकारांचं ऑडीशन घेतलं होतं. हा सीन नैसर्गिक वाटावा यासाठी स्टंट डायरेक्टरने ग्राफिक्सचा उपयोग न करण्याचं ठरवलं होतं.
'मोहेंजोदरो' मध्ये हृतिकने अनेक अक्शन सीन्स स्वतः शूट केले आहेत. यासाठी कोणत्याही अनिमेशनचा वापर केला गेला नाही. दिग्दर्शकांनी 'मोहेंजोदरो'ला पुरेपूर बनवण्यासाठी कसलीही कमी ठेवली नसल्याचं या एका सीनमधून दिसत आहे.
कोणता आहे तो सीन?
हृतिक रोशनच्या विरुद्ध लढण्यासाठी दोन कलाकारांची गरज होती. मात्र तसे कलाकार मिळत नसल्याने तब्बल 300 कलाकारांचं ऑडीशन घ्यावं लागलं. या सीनमध्ये हृतिक म्हणजेच सरमन दोन महाकाय लोकांचा सामना करतो. पण हा सीन नैसर्गिक वाटावा यासाठी खास परिश्रम घेऊन 300 जणांपैकी दोघांची निवड करण्यात आली.
दिग्दर्शकाने 'मोहेंजोदरो' ला जास्तीत जास्त नैसर्गिक बनवण्यावर भर दिला आहे. प्रत्येक सीन वास्तव दिसेल, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. हा सिनेमा येत्या 12 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement