एक्स्प्लोर
Advertisement
'फोर्स 2'चं शूटिंग मनसेने थांबवलं, 35 परदेशी कलाकार ताब्यात
मुंबई : फोर्स 2 चित्रपटाचं शूटिंग महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने बंद पाडलं आहे. वर्क परमिट नसताना परदेशी कलाकार चित्रपट काम करत असल्याने मनसेने शूटिंग थांबवलं. मनसेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परदेशी कलाकारांनीही ताब्यात घेतलं आहे.
गोरेगावच्या ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये फोर्स 2 चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. संबंधित कलाकारांकडे वैध व्हिसाही नसल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर 35 परदेशी कलाकारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ज्या कलाकारांकडे वर्क परमिट नसल्याचं पोलिसांना कारवाईत आढळलं, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर संबंधित देशांच्या दुतावासाशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येईल.
मनसेने चित्रपटाचं शूटिंग बंद पाडलं, त्यावेळी चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता जॉन अब्राहमही सेटवर हजर होता. विपुल शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement