![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mera Piya Ghar Aaya 2.0 Song: 'मेरा पिया घर आया' चे 2.O व्हर्जन येणार प्रेक्षकांच्या भेटीस; सनी लिओनीचा ग्लॅमरस अंदाज, गाण्याचा व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित म्हणाली...
Mera Piya Ghar Aaya 2.0 Song: माधुरीच्या 'मेरा पिया घर आया' या गाण्याचे 2.O व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या गाण्यात प्रेक्षकांना सनी लिओनीचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
![Mera Piya Ghar Aaya 2.0 Song: 'मेरा पिया घर आया' चे 2.O व्हर्जन येणार प्रेक्षकांच्या भेटीस; सनी लिओनीचा ग्लॅमरस अंदाज, गाण्याचा व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित म्हणाली... Mera Piya Ghar Aaya 2.0 Song madhuri dixit gives reaction to sunny leone Mera Piya Ghar Aaya 2.0 song video Mera Piya Ghar Aaya 2.0 Song: 'मेरा पिया घर आया' चे 2.O व्हर्जन येणार प्रेक्षकांच्या भेटीस; सनी लिओनीचा ग्लॅमरस अंदाज, गाण्याचा व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/ad4bbebf4502de68aa7bbc30e15d75471696682455171259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mera Piya Ghar Aaya 2.0 Song: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) 'याराना' हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शक डेविड धवन यांनी केलं होतं. 'याराना' चित्रपटातील 'मेरा पिया घर आया' हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्यातील माधुरीच्या डान्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही माधुरीचे हे आयकॉनिक प्रेक्षक आवडीनं ऐकतात. आता माधुरीच्या 'मेरा पिया घर आया' या गाण्याचे 2.O व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मेरा पिया घर आया- 2.O गाण्याचा (Mera Piya Ghar Aaya 2.0) एक व्हिडीओ अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर माधुरीनं प्रतिक्रिया देखील दिली आहे.
सनी लिओनी शेअर केला गाण्याचा टीझर
मेरा पिया घर आया- 2.O या गाण्यात सनी लिओनीचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सनीनं नुकताच या गाण्याचा एक शॉर्ट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, "हे जगासोबत शेअर करताना खूप अभिमान वाटत आहे. माधुरी दीक्षितच्या गाण्याचा इतक्या मोठ्या स्केलवर रिमेक करणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मेरा पिया घर आया- 2.O टीझर रिलीज झाला आहे."
View this post on Instagram
काय म्हणाली माधुरी?
माधुरीनं नुकतीच एक इन्स्टा स्टोरी शेअर करुन मेरा पिया घर आया- 2.O या गाण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सनीनं शेअर केलेला मेरा पिया घर आया- 2.O या गाण्याचा टीझर पोस्ट करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी गाण्याच्या 2.0 ची वाट बघत आहेत. तुला माझ्याकडून शुभेच्छा.' माधुरीनं सनीला टॅग देखील केलं आहे.
सनी लिओनीचे मेरा पिया घर आया- 2.O हे गाणे 8 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सनीचा ‘करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक हे सनीच्या जीवनावर आधारित आहे. तसेच सनीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तिच्या मेरा पिया घर आया- 2.O या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)