(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Me Vasantrao : माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं! 'मी वसंतराव'चा ट्रेलर प्रदर्शित
Me Vasantrao : 'मी वसंतराव' हा सिनेमा 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Me Vasantrao : 'मी वसंतराव' (Me Vasantrao) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा ज्येष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन निपुन धर्माधिकारीने केले आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य आणि सांगितिक प्रवास 'मी वसंतराव' या सिनेमात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वताःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची ही गोष्ट म्हणजे 'मी वसंतराव' हा सिनेमा असणार आहे.
सिनेमात वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्या नातवाने म्हणजेच राहुल देशपांडेने साकारली आहे. राहुल देशपांडे व्यतिरिक्त सिनेमात अनिता दाते, अमेय वाघ,पुष्करराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जिओ स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली असून हा सिनेमा 1 एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
'मी वसंतराव'च्या प्रवासाबद्दल राहुल देशपांडे म्हणाले,"आपण स्वतःचा जितका चहुबाजूनं शोध घेऊ, तितकं आपण समृद्ध होतो. याचा अनुभव मला 'मी वसंतराव' करताना आला. या प्रवासात एक कलाकार आणि मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी वृद्धिंगत झालो. आजोबा आणि त्यांची गायकी हा माझ्यासाठी मुळात जिव्हाळ्याचा विषय. मला आजोबांचा सहवास जास्त लाभला नाही. मात्र आजीकडून, आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींकडून मला त्यांना समजून घेता आलं. त्यांची गाणी ऐकली, रेकॉर्डिंग्स पाहिले. त्यातील बारकावे, हावभाव याचा मी अभ्यास केला. वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर आजोबांमधील बदल माझ्यात उतरवणं माझ्यासाठी तसं आव्हानात्मक होतं. मला शारीरिक मेहनतही तितकीच घ्यावी लागली. कुठेही त्यांच्या व्यक्तिमत्वाला धक्का पोहोचू नये, याची माझ्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम पुरेपूर काळजी घेत होतो. 'मी वसंतराव' म्हणजे त्यांच्या जीवनकार्याला वाहिलेली आदरांजली आहे."
संबंधित बातम्या