Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' मधील आलियाचा फर्स्ट लूक रिलीज; अयान मुखर्जीनं शेअर केला व्हिडीओ
नुकताच 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील आलियाचा (Alia Bhatt) फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

Brahmastra First Look : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) आज वाढदिवस आहे. तिच्या 29 व्या वाढदिवसानिमित्त 'आरआरआर' मधील शोले हे गाण प्रदर्शित झालं. आता नुकताच 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील आलियाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
ब्रह्मास्त्र चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं एक व्हिडीओ शेअर करून या चित्रपटातील आलियाचा लूक रिलीज केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅप्पी बर्थ डे आलिया. तुझ्या वाढदिवसानिमित्त ही खास गोष्ट शेअर करत आहे. ही आहे ईशा- 'ब्रह्मास्त्र' ची शक्ती' या 31 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आलियाचे 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील काही लूक दिसत आहेत.
आलियानं देखील आयानने शेअर केलेला व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'मला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयान माय वंडर बॉय, मी तुझे आभार मानते. '
View this post on Instagram
आलिया आणि रणबी कपूर यांच्यासोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय आणि नागार्जुन हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. 9 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा :
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Bollywood Movies : होळीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी, हे बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित
- The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























