एक्स्प्लोर
Advertisement
भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याची मागणी जोर धरु लागली असताना, पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता मार्क अन्वर याने आगीत तेल ओतलं आहे.
अन्वरला बाहेरचा रस्ता
कोरोनेशन स्ट्रीट शोमधील अभिनेता मार्क अन्वरने ट्विटरवर भारतीयांबाबत अश्लाघ्य भाषेत ट्वीट केले. वांशिक भेदभाव निर्माण करणारी विधानं केल्याप्रकरणी आयटीव्ही चॅनलने अन्वरवर कारवाई करत बाहेरचा रस्ता दाखवला.
मार्क अन्वर काय म्हणाला?
मार्क अन्वरने शिव्यांचा वापर करत भारतावर टीका केली. त्याने एका ट्वीटमध्ये म्हटलंय, "भारतीय आमच्या काश्मिरी बंधू-भगिनींना मारत आहेत. पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी आणली पाहिजे. पाकिस्तानी नागरिकांनीही भारत सोडलं पाहगिजे. पाकिस्तानी कलाकार भारतात का काम करत आहेत? त्यांना पैशावर जास्त प्रेम आहे का?"
भारतातील पाक कलाकारांवरही अन्वरचा निशाणा
अभिनेता मार्क अन्वरचे ट्वीट भारताविरोधात विष पेरणारे आहेत. शिवाय, भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवरही मार्क अन्वरने टीका केली आहे. आधीच भारतात पाकिस्तानी कलाकारांविरोधात संतापाचं वातावरण असताना, मार्क अन्वरच्या विधानाने या संतापात आणखी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोनेशन स्ट्रीट शो ब्रिटनमध्ये 50 वर्षांपासून लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोमध्ये मार्क अन्वरची शरीफ नजीर नावाची भूमिका आहे.
झी ग्रुपकडूनही पाकिस्तानी कलाकारांना सज्जड दम
दरम्यान, याआधी झी ग्रुपचे चेअरमन आणि राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनी उरी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यास पाकिस्तानी कलाकारांना बजावलं. अन्यथा, त्यांनी निघून जावं, असा इशारा चंद्रा यांनी दिला आहे. नवाज शरीफ यांच्या यूएनमधील भाषणानंतर झी समूहाच्या 'जिंदगी'वरील पाकिस्तानी कलाकरांचे शो बंद करण्याचा इशाराही चंद्रा यांनी दिला आहे.
करण जोहर म्हणतो....
पाकिस्तानी कलाकारांवरुन बॉलिवूडमध्येही दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या मते, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणून समस्या सुटणार नाही. मात्र, इथे मुद्दा असा आहे की, करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान हा मुख्य भूमिकेत आहे. फवाद खान हा पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेता असून, तो सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावताना दिसतो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement