(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठी अभिनेत्रींना हिंदी चित्रपटात कामवाल्या बाईची भूमिका का मिळते? अभिनेत्रीने सांगितलं पडद्यामागचं सत्य
Trupti Khamkar : मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाल्या बाईची काम का मिळतात, असा प्रश्न मुलाखतदाराने विचारताच तृप्ती खामकरने पडद्यामागचं सत्य सांगितलं.
Trupti Khamkar : मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. सई ताम्हणकर, सिद्धार्थ, जाधव, प्रिया बापट, मुक्ता बर्वे, जितेंद्र जोशी, अमेय वाघ, वैभव तत्ववादी यासारख्या अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये अभिनयाची जादू दाखवली आहे. काही मराठी कलाकार बिग बजेट प्रोजेक्टमध्येही दिसले आहेत, असं असलं तरी दुसरीकडे मराठी अभिनेत्रीना हिंदी चित्रपटांमध्ये कामवाल्या बाईची भूमिका दिला जाते. मराठी अभिनेत्रींना हिंदी चित्रपटात कामवाल्या बाईची भूमिका का मिळते? याचा मोठा खुलासा अभिनेत्री तृप्ती खामकरने केला आहे.
मराठी अभिनेत्रींना हिंदी कामवाल्या बाईची भूमिका का मिळते?
मराठी अभिनेत्री प्रामख्याने बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये कामवाल्या बाईच्या भूमिकेत दिसतात. अभिनेता शाहिद कपूरचा हिट चित्रपट 'कबीर सिंग' बहुतेक सगळ्यांनी पाहिला असेल, त्यामध्ये धावणारी बाई आठवत असेल. 'कबीर सिंग' चित्रपटात कामवाल्या बाईची भूमिका अभिनेत्री वनिता खरात हिने केली होती. अभिनेत्री तृप्ती खामकरने एका मुलाखतीत सांगितलं की, 'कबीर सिंग चित्रपटातील कामवाल्या बाईच्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिलं होतं, पण, त्यांना एक जाडी बाई हवी होती आणि तिला फक्त झाडू घेऊन धावायचं होतं.'
अभिनेत्री तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
तृप्ती खामकरने पुढे सांगितलं की, मी आतापर्यंत कित्येक वर्ष कामवाल्या बाईचंच काम केलं आहे. अर्बन कंपनीची, कामवाली, धर्मा प्रोडक्शनची कामवाली. मी सर्व ठिकाणी कामवाली बाई केली. कुठली-कुठली म्हणजे सगळीकड कामवाली बाईच केली. मराठीतील मध्यमवयीन नवोदित अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाल्या बाईची काम का मिळतात, असा प्रश्न मुलाखतदाराने विचारताच तृप्ती खामकरने पडद्यामागचं सत्य सांगितलं.
'हे' आहे यामाचं मूळ कारण
अभिनेत्री तृप्ती खामकर हिंदी चित्रपटातील कामवाल्या बाईंच्या भूमिकेबद्दल म्हणाली की, "हे फार दु्र्दैवी टाइपकास्ट आहे. तुम्ही मराठी बोलता आणि त्यामुळे तुम्ही मराठी ॲक्सेंटमध्ये हिंदी बोलू शकता, त्यातच जर तुम्ही दिसायला जाड असाल, तर मग तुम्ही बाईच. मी ऑडिशनला वेस्टर्न कपडे जरी घालून गेले तरी, मला तिथे साडी आणली आहेस का? असं विचारायचे आणि आजही विचारतात".
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :