(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केआरकेविरोधात मनोज बाजपेयीचा मानहानीचा खटला; 'फॅमिली मॅन 2' ला पोर्नला प्रोत्साहन देणारी सीरिज असल्याचे ट्विट
स्वत: ला चित्रपट समीक्षक सांगत चित्रपट आणि कलाकारांबद्दल असभ्य टिप्पणी करण्यासाठी प्रसिद्द असलेल्या कमल आर. खान विरोधात मनोज बाजपेयी यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
मुंबई : बॉलिवूडबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने कायम चर्चेत राहणारा आणि स्वतःला चित्रपट समीक्षक सांगत चित्रपट आणि कलाकारांवर टिप्पणी करणाऱ्या कमल आर. खान विरोधात मनोज बाजपेयी याने मानहानीचा खटला दाखल केला आहे.
विशेष म्हणजे मनोज बाजपेयीची नुकतीच रिलीज झालेली वेब सीरिज 'फॅमिली मॅन 2' देखील त्याच्या पहिल्या सीझनसारखीच चाहत्यांना आवडत आहे. पण केआरके म्हणून ओळखले जाणारे कमल आर. खान यांनी अलीकडेच सोशल मीडियाद्वारे मनोज बाजपेयी आणि त्याच्या शोवर निशाणा साधला होता. यामुळे संतप्त झालेल्या मनोज बाजपेयीने इंदूरमध्ये केआरकेविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.
मनोज बाजपेयीने केआरकेविरोधात इंदूरच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आयपीसीच्या कलम 500 (बदनामीविरुद्ध शिक्षा) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीद्वारे त्यांनी केआरकेविरुद्ध फौजदारी बदनामीचा खटला दाखल करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
मनोज बाजपेयीने केआरकेविरोधात इंदूरच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आयपीसीच्या कलम 500 (बदनामीविरुद्ध शिक्षा) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीद्वारे त्यांनी केआरकेविरुद्ध फौजदारी बदनामीचा खटला दाखल करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
एबीपी न्यूजला इंदूरच्या एका विश्वसनीय स्त्रोताकडून माहिती मिळाली आहे की मनोज बाजपेयी केआरकेने त्यांच्याविरोधात केलेल्या असभ्य ट्विट्समुळे दुखावले गेले होते, त्यांनी मंगळवारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात उपस्थित राहून केआरकेविरोधात तपशीलवार तक्रार दाखल केली.
मनोज बाजपेयीने इंदूर न्यायिक दंडाधिकारी (वर्ग 1) च्या न्यायालयात केआरकेविरोधात फौजदारी बदनामीची तक्रार दाखल केली आहे, याची पुष्टी करताना, मनोजचे वकील परेश सोनी यांनी एबीपी न्यूजला सांगितले, "या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 सप्टेंबरला होईल."
'फॅमिली मॅन 2' ही मालिका पोर्नला प्रोत्साहन देणारी आहे, इथच न थांबता केआरकेने आपल्या 26 जुलै रोजी केलेल्या ट्विटमध्ये मनोज बाजपेयीला 'गंजेडी' कलाकार असेही म्हटले होते.
अलीकडेच, 'राधे' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, केआरकेने सलमान खान आणि चित्रपटाविरोधात अनेक आक्षेपार्ह टिप्पणी केल्या होत्या, त्यानंतर सलमान खानने त्याच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता.