(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Niravadhi : महेश मांजरेकरांनी केली 'निरवधी' सिनेमाची घोषणा; सुबोध भावे मुख्य भूमिकेत
Niravadhi : महेश मांजरेकरांचा 'निरवधी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Niravadhi : गेल्या काही दिवसांपासून अनेक दर्जेदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कोरोनामुळे प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिलं होतं. पण कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'झिम्मा', 'पावनखिंड', धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता 'निरवधी' (Niravadhi) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महेश मांजरेकर सध्या बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आहेत. 2 ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच महेश मांजरेकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 'निरवधी' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळत आहेत.
View this post on Instagram
'हर हर महादेव' नंतर सुबोध दिसणार 'निरवधी' सिनेमात
अभिनेता सुबोध भावे 'निरवधी' सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करणार आहे. सुबोधने गेल्या काही दिवसांपूर्वी 'हर हर महादेव' या सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते. या सिनेमात सुबोध शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून पुढील वर्षात दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सुबोधचा 'निरवधी' सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महेश मांजरेकरांनी शेअर केले 'निरवधी'चे पोस्टर
महेश मांजरेकरांनी 'निरवधी' सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिलं आहे," महेश वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित 'निरवधी'... सुबोध भावे, गौरी इंगवले आणि उपेंद्र लिमये अभिनित... 'निरवधी' 2023 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला!!!. 'निरवधी' सिनेमाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेश मांजरेकरांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर आता पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या