एक्स्प्लोर

Brahmastra Box Office Collection : आलिया-रणबीरच्या ब्रह्मास्त्रची बॉक्स ऑफिसवर जादू; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (10 सप्टेंबर) देखील ब्रम्हास्त्र (Brahmastra) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Brahmastra Box Office Collection : अभिनेता आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा ब्रम्हास्त्र (Brahmastra) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला तसेच चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFX ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (10 सप्टेंबर) देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...

बॉक्स ऑफिस कलेक्शन

ब्रह्मास्त्र चित्रपटानं पहिल्या  दिवशी 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ब्रह्मास्त्रनं बॉक्स ऑफिसवर जवळपास 42 कोटींचे कलेक्शन केलं आहे. यामध्ये 37 कोटी हिंदी भाषेतील आणि 5 कोटी इतर भाषांतील कलेक्शन आहे. देशभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचं एकूण 79 कोटींची कमाई केली आहे. 

जगभरातील बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रचा धुमाकूळ  

ब्रह्मास्त्र या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 75 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं जगभरात  85 कोटींची कमाई केली. दोन दिवसांमध्ये या चित्रपटानं 160 कोटींची कमाई केली. अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.  

तगडी स्टार कास्ट
चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दीपिकानं या चित्रपटानं रणबीरच्या आईची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या लुक्सचे फोटो व्हायरल होत आहेत. ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले. चित्रपट रिलीज होण्याआधी सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरु झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते.  या ट्रेंडाचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होईल, असं म्हटलं जात होतं. पण सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 
 
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget