एक्स्प्लोर
Advertisement
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू बॉलिवूडमध्ये?
महेश बाबू 'स्पायडर' या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकण्याची चिन्हं आहेत.
मुंबई : तेलुगू सुपरस्टार महेश बाबू लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. महेशच्याच 'स्पायडर' या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये तो झळकण्याची चिन्हं आहेत.
महेश बाबू सहकुटुंब स्पेनला सुट्टीवर गेला होता. त्यावेळी हैदराबादला जाण्यापूर्वी त्याने मुंबईत काही चित्रपट निर्मात्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने अनेक बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे महेश बाबूचं बॉलिवूड कनेक्शन आहे.
त्याशिवाय महेशच्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे (पोकिरी-वाँटेड) हिंदी भाषेत रिमेक झाले आहेत, तसेच त्याचे काही डब केलेले सिनेमेही रिलीज झाले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये त्याचे अनेक चाहते आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement