एक्स्प्लोर
माझा जन्म पंजाबचा, मात्र महाराष्ट्राला मी आई मानतो : अभिनेते धर्मेंद्र

जळगाव : माझा जन्म पंजाबमध्ये झाला. मात्र, महाराष्ट्राला मी आई मानतो, या महाराष्ट्राचे उपकार मी आणि माझा परिवार कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत अभिनेता धर्मेंद्र यांनी महाराष्ट्राप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे दिवंगत चिरंजीव निखिल खडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य जळगावात एका क्रिकट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेच्या समारोपाला धर्मेंद्र आणि अभिनेता बॉबी देओल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “मी मूळचा पंजाबमधील शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा आहे. मात्र, माझे स्वप्न घेऊन मी महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रात वाढलो, मोठा झालो. महाराष्ट्राने एवढे प्रेम आणि लोकप्रियता मला आणि माझ्या परिवाराला दिली, त्या महाराष्ट्राला मी माझी आई मानतो. तिचे उपकार माझा परिवार कधीही विसरु शकणार नाही.” असे भावनिक उद्गार अभिनेते धर्मेंद्र यांनी जळगाव येथे काढले. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा























