Jeevan Gaurav Puraskar 2024 : अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार; दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही होणार गौरव
Jeevan Gaurav Award 2024 : 58 आणि 59 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
Jeevan Gaurav Puraskar 2024 : राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. अभिनेता शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर केला असून दिग्दर्शक एन. चंद्रा यांचाही गौरव होणार आहे. यासोबत राज्य सरकारकडून इतरही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम याचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. 2023 मधील चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहिर करण्यात आला आहे. तर 2023 स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करण्यात आला आहे.
यासोबतच, 2023 सालचा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक-दिग्दर्शक तसेच अभिनेते दिग्पाल लांजेकर यांना जाहिर करण्यात आला आहे. 2023 वर्षातील स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जेष्ठ लेखक- दिग्दर्शक-संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे.
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे.
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) August 14, 2024
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ…
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. 58 आणि 59 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीची नामांकनांची यादी समोर आली आहे. सन 2020 सालाच्या 58 व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट कडुगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तसेच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासाठी जून, जयंती, फनरल या तीन चित्रपटांना पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
५८ आणि ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीची नामांकने घोषित करतांना मला आनंद होत आहे.
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) August 14, 2024
सन २०२० सालाच्या ५८ व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट कडुगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी,…
सन 2021 सालाच्या 59 व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणं, एकदा काय झालं, गोदावरी, फ्रेम, कारखानिंसांची वारी, इरगल, येरे येरे पावसा, बाल भारती, राख, बाईपण भारी देवा या दहा चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. तसेच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करीता जननी, लकडाऊन be positive, आता वेळ झाली आणि दिग्दर्शनाकरीता तिचं शहर होणं, फ्रेम, कुलूप या तीन चित्रपटांना पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :