एक्स्प्लोर

Maharaj Movie Controversy : जुनैदच्या बॉलिवूड पदापर्णाच्या चित्रपटाला वादाचे ग्रहण; 'महाराज' चित्रपटाविरोधात कोर्टात याचिका दाखल

Maharaj Movie Controversy : 'महाराज' या चित्रपटाच्या माध्यमातून जुनैद सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत असताना या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Maharaj  Movie Controversy :   बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा लेक जुनैद खान (Junaid Khan) आता सिनेइंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, जुनैदच्या पहिल्याच चित्रपटाला वादाचे ग्रहण लागले आहे. 'महाराज' या चित्रपटाच्या माध्यमातून जुनैद सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत असताना या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या रिलीजला विरोध करत बजरंग दलाने मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात (Dindoshi Court) याचिका दाखल केली आहे. 

बजरंग दलाकडून याचिका दाखल 

आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या पदार्पणातील चित्रपटाविरोधात बजरंग दलाने याचिका दाखल केली आहे. आपल्या याचिकेत बजरंग दलाने चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली एका विशेष समितीकडे चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्याची मागणी केली आहे. महाराज चित्रपटात हिंदू धार्मिक गुरुंना नकारात्मक रुपात दाखवण्यात आल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या काही भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असेही बजरंग दलाने म्हटले आहे. 

प्रमोशनशिवाय रिलीज होणार चित्रपट

'महाराज' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नसून थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट कोणत्याही प्रमोशन किंवा टीझरशिवाय थेट OTT वर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

'महाराज'ची कथा काय?

'महाराज' हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून त्यात जुनैदसोबत जयदीप अहलावतची भूमिका आहे. हा चित्रपट 1862 च्या महाराज लिबेल केसवर आधारित आहे. हे प्रकरण भारतातील सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर लढाईपैकी एक समजले जाते. चित्रपटात जुनैदने पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका साकारली आहे. तर अहलावतने वल्लभाचार्य पंथाचे प्रमुख जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.

'महाराज' मध्ये कोणते कलाकार?

'महाराज' चित्रपटात जुनैद खान, जयदीप अहलावत यांच्यासह विपुल मेहता, शालिनी पांडे, शर्वरी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी 'यशराज फिल्मस एंटरटेन्मेंट'च्या बॅनर अंतर्गत केली आहे. 

इतर संबंधित बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
प्रसिद्ध गायिकेनं नशेत कार भरधाव पळवली; पोलिसांनी अडवून अटक केली, आता थेट कोर्टात...
Bollywood Director Struggle Life Story: सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं
सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget