(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aamir Khan son Junaid Debut : आमिरच्या लेकाचं सिनेइंडस्ट्रीत पदार्पण; जुनैदचा पहिला चित्रपट OTT वर होणार रिलीज, कधी, कुठे पाहाल?
Maharaj OTT Release Date : मागील चार वर्षांपासून जुनैद बॉलिवूडमध्ये झोकात पदार्पण करण्यासाठी मेहनत घेत होता. आता जुनैद रुपेरी पडद्यावर अभिनेते जयदीप अहलावत यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Maharaj OTT Release Date : बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा लेक जुनैद खान (Junaid Khan) आता सिनेइंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील चार वर्षांपासून जुनैद बॉलिवूडमध्ये झोकात पदार्पण करण्यासाठी मेहनत घेत होता. आता जुनैद रुपेरी पडद्यावर अभिनेते जयदीप अहलावत यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी सज्ज झाला आहे. जुनैदचा चित्रपट हा थिएटरमध्ये रिलीज होणार नसून तो ओटीटीवर रिलीज होणार आहे.
कधी होणार रिलीज? (Maharaj OTT Release Date)
जुनैद हा 'महाराज' या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे. 'महाराज' हा चित्रपट 14 जून रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट 1862 मधील एका घटनेवर आधारीत गोष्ट आहे. पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्यावर आधारीत आहे. करसनदान मुलजी यांनी त्याकाळी महिलांचे अधिकार, सामाजिक सुधारणा यासाठी महत्त्वाचे काम केले होते. मुलजी यांच्याविरोधात खटलादेखील दाखल करण्यात आला होता.
'महाराज' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? (Maharaj OTT Release)
'महाराज' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सने पोस्ट शेअर करताना म्हटले की, एक ताकदवान व्यक्ती आणि एक निडर पत्रकारामधील सत्याची लढाई. 1860 च्या दशकातील सत्य घटनेवर आधारीत महाराज...
View this post on Instagram
'महाराज' मध्ये कोणते कलाकार?
'महाराज' चित्रपटात जुनैद खान, जयदीप अहलावत यांच्यासह विपुल मेहता, शालिनी पांडे, शर्वरी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी 'यशराज फिल्मस एंटरटेन्मेंट'च्या बॅनर अंतर्गत केली आहे.