Madhuri Dixit : 'अश्लील'बोलांमुळे माधुरी अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
Madhuri Dixit Song : माधुरी दीक्षितची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. पण अश्लील बोल असल्यामुळे माधुरीचं एक गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. रिलीजआधीच 1 कोटी कॅसेट विकल्या गेल्या होत्या.
Madhuri Dixit : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. माधुरी दीक्षितची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. पण अश्लील बोल असल्यामुळे माधुरीचं एक गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. रिलीजआधीच तिच्या गाण्याच्या 1 कोटी कॅसेट विकल्या गेल्या होत्या. 1993 मध्ये आलेला 'खलनायक' चित्रपट त्याकाळी चांगलाच गाजला. या चित्रपटात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील माधुरी दीक्षितच्या 'चोली के पीछे क्या है' या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. माधुरीच्या या गाण्यात अश्लीलतेचा आरोप करण्यात आला होता.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं माधुरीचं गाणं
'चोली के पीछे क्या है' हे गाणं रेडिओ आणि टीव्हीवर बॅन करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली होती. गाण्यातील माधुरीचा आऊटफिट खूपच कमाल होता. माधुरीचा आऊटफिट त्याकाळी चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्यात येत होती. त्यावेळी न्यायालयाने गाण्यात काही गैर नसल्याचं म्हटलं होतं.
माधुरीच्या गाण्याचे 1 कोटीपेक्षा जास्त कॅसेट विकले गेलेले
माधुरी दीक्षितच्या 'चोली के पीछे क्या है' या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. रिलीजच्या एका आठवड्याआधीच या गाण्याचे 1 कोटीपेक्षा जास्त कॅसेट विकले गेले होते. आज हे गाणं माधुरीच्या करिअरमधलं आयकॉनिक सॉन्ग ठरलं आहे. गाण्याला अलका याग्निक आणि ईला अरुण यांनी आवाज दिला आहे. तसेच दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांनी या गाण्याची कोरियोग्राफी केली आहे. आनंद बख्शी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. खलनायक सुपरहिट होण्यात या गाण्याचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं. या गाण्याने माधुरी दीक्षितला रातोरात स्टारडम मिळालं होतं.
'चोली के पीछे' या गाण्यासह खलनायक मधील संजय दत्त यांच्या पात्रावरुनदेखील वाद निर्माण झाला होता. संजय दत्तने चित्रपटात आतंकवादीची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या प्रीमिअरआधीच अभिनेत्याला अटक करण्यात आली होती.
'खलनायक' हा चित्रपट 6 ऑगस्ट 1993 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता सिनेमाच्या रिलीजला 30 वर्षे झाली आहेत. 'खलनायक' हा चित्रपट त्याकाळी चांगलाच गाजला होता. आजही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
संबंधित बातम्या