Madgaon Express Trailer : तीन जिगरी मित्र अन् जिवाचा गोवा करताना... ; 'मडगाव एक्स्प्रेस' धमाल ट्रेलर पाहिलात का?
Madgaon Express Trailer : कुणाल खेमूचा बहुप्रतिक्षित 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे.

Madgaon Express Trailer : गोव्याला जाण्याचे प्लानिंग (Goa Vacation) अनेकजण आपल्या शालेय जीवनापासूनच करतात. पण अनेक जणांची तरुणाई सरूनही हे प्लानिंग फक्त कागदावरच राहते. गोव्यात जाऊन धमाल करण्याचे प्लानिंग तडीस नेण्याचा निश्चय तीन मित्र पूर्ण करतात. पण, जिवाचा गोवा करताना या तिघांचा जीवच धोक्यात येतो. पण नेमकं काय घडते, त्यांना जीव वाचवण्यासाठी काय करावे लागते हे 'मडगाव एक्स्प्रेस'मध्ये (Madgaon Express ) दिसणार आहे.
कुणाल खेमूचा बहुप्रतिक्षित 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. या कॉमेडी चित्रपटात प्रतीक गांधी, अविनाश तिवारी आणि दिव्येंदू शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 22 मार्चला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
'मडगाव एक्स्प्रेस'च्या ट्रेलरमध्ये खास काय?
2 मिनिट 38 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये हा चित्रपट विनोदी धाटणीचा असल्याचा दिसून येत आहे. यामध्ये सस्पेन्स, थ्रिलर आहे. 'मडगाव एक्स्प्रेस'च्या ट्रेलरमध्ये तीन मित्र गोव्याला जाण्याचा प्लॅन करतात. गोव्यातील त्यांच्या प्लॅनिंगमध्ये, ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडी, सर्वकाही अतिशय मजेदार पद्धतीने घडताना दिसत आहे.
View this post on Instagram
चित्रपटाची कथा ही बालपणीच्या तीन मित्रांची आहे. हे तिघेजण लहानपणापासून गोव्याला जाण्याचा विचार करत आहेत. पण प्रत्येक वेळी त्याचे नियोजन फसते. त्यानंतर हे तिघे मित्र गोव्याला जातात. जिवाचा गोवा करताना या घटनेने या तिघांचाही जीव धोक्यात येतो.
चित्रपटात नोरा फतेहीचा खास अंदाज दिसला आहे. कुणाल खेमूचा हा चित्रपट 22 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
मडगाव एक्सप्रेसमधील उपेंद्रचा रॉकिंग अंदाज
उपेंद्रचा या चित्रपटातील रॉकिंग अंदाज समोर आला आहे. यामध्ये उपेंद्रच्या लूकमुळे तसेच त्याच्या डॉयलॉग्जमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात उपेंद्र मेंडोझा हे अतरंगी पात्र साकारणार आहे,. उपेंद्र हा अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा प्रमुख दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
