VIDEO | मुलाच्या तबला वादनावर बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने धरला ठेका
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बॉलिवूड स्टार्सही आपल्या घरात आहेत. अशातच बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार माधुरी दीक्षित कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे आपल्या घरात आयसोलेशनमध्ये आहे. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध अदाकारा माधुरी दीक्षित लॉकडाऊनच्या काळात आपला वेळ कसा घालवतेय याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहेच. अशातच माधुरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित क्लासिकल डान्स करताना दिसून येत आहे. एवढचं नाहीतर व्हिडीओमध्ये माधुरी ठेका धरताना दिसली तर माधुरीचा मुलगा तबला वाडवताना दिसून आला.
व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की, बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरीने आपल्या मुलांनाही संगीताची गोडी लावली आहे. या व्हिडीओमध्ये माधुरीचा मुलगा तबला वाजवत असून माधुरी त्या तालावर ठेका धरत आहे. सोशल मीडियावर या दोघांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. युजर्स या मायलेकांच्या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षावर करत आहेत. तर हा व्हिडीओ शेअरही करत आहेत.
माधुरीने शेअर केलेला या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये चाहचे तिच्या मुलाचीही प्रशंसा करत आहेत. माधुरी दीक्षितने हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे की, 'क्वॉरंटाईन आपल्याला त्या गोष्टी करायला मदत करत आहे, ज्या करण्याची आपल्याला इच्छा होती. हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा आणि जाणून घ्या की मला नेहमी काय करण्याची इच्छा आहे.'
व्हिडीओमधील तबल्याचा ताल आणि घुंगरूंचा आवाज चाहत्यांचं मन जिंकून जात आहे. या व्हिडीओवर अभिनेत्री मौनी रॉयनेही कमेंट केली आहे. तिने हार्ट इमोजी शेअर करत डान्सिंग क्विन माधुरीच्या व्हिडीओवर आपली रिअॅक्शन दिली आहे.
संबंधित बातम्या :
आता माझी सटकली...! जेव्हा अजय देवगणला डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांचा राग येतो... Coronavirus | मनोधैर्य वाढवणारं बॉलिवुडकरांचं 'मुस्कुराएगा इंडिया' गाणं; पंतप्रधानांकडून कौतुक Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी शाहरूख खान करणार मदत; ट्विटरवरून दिली माहिती Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत Coronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनाग्रस्तांसाठी मदत