एक्स्प्लोर

Little Things' Season 4: 'लिटल थिंग्स'चा चौथा सीजन येतोय ओटीटी गाजवायला; ट्रेलर प्रदर्शित

प्रेक्षकांच्या आवडीच्या लिटल थिंग्स'चा चौथा सीजन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मिथिला आणि ध्रुवदेखील या वेवसीरीजसाठी प्रचंड उत्सुक आहेत.

Little Things' Season 4: ओ़टीटी प्लॅटफॉमर्सवर काही वेबसीरीज प्रचंड गाजतात. त्यात 'लिटल थिंग्स'ची गोष्टच वेगळी आहे. ही वेवसीरीज कितीही वेळा पाहिली तरी प्रेक्षक कंटाळत नाहीत. या वेबसीरीजचे कथानक काही जगावेगळे नाही. साधा, सोपा विषय. दररोज घडणाऱ्या लहानसहान गोष्टी आणि त्या गोष्टींत दडलेले प्रेम. अशा छोट्या गोष्टींत लपलेलं प्रेम शोधण्याचा प्रयत्न सीरीजमधून करण्यात आला आहे. लिटल थिंग्समध्ये मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल मुख्य भूमिकेत दिसतील. 

मिथिला त्यात काव्याची भूमिका साकारणार आहे तर ध्रुवची भूमिका ध्रुव्र सहगल साकारणार आहे. 'लिटल थिंग्स'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, त्यांच्या या लाडक्या सीरीजचा ऑफिशिअल ट्रेलर यूट्यूवर प्रदर्शित झालेला आहे. लवकरच ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार आहे. 

'लिटल थिंग्स'चा हा शेवटचा सीजन 
आतापर्यंत  'लिटल थिंग्स'चे तीन सीजन प्रदर्शित झाले आहेत. काव्या आणि ध्रुवच्या आयुष्यातील चढ-उतार. रोज होणारा त्रास, एकमेकांत उडणारे खटके चाहत्यांना चांगलेच भावतात. कारण ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातदेखील या सगळ्या गोष्टी फेस करत असतात. त्यामुळे या सीरीजचा चाहता हा तरुणवर्ग आहे. पण 'लिटिल थिंग्स'चा हा शेवटचा सीजन असणार आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. 

मिथिला आणि ध्रुव आहेत उत्सुक
'लिटल थिंग्स'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारे मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल या चौथ्या सीजनला घेऊन खूप उत्सुक आहेत. या सीरीजमुळेच त्यांनी नाव कमावले आहे. त्यांच्या भूमिकेवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आहे. ही सीरीज दोघांच्याही जवळची आहे. दोघेही चौथ्या सीजनसाठी उत्सुक असले तरी हा शेवटचा सीजन असल्याचे कळल्यानंतर नाराज झाले आहेत. आता चौथा सीजन प्रदर्शित झाल्यानंतरच त्याला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळणार हे कळेल. आधीच्या सीजनवर चाहत्यांनी ज्या पद्धतीने प्रेम केले त्याचप्रकारे या सीजनवर देखील करतील अशी मिथिला आणि ध्रुवला आशा आहे. 

 

सणासुदीला ओटीटी प्लॅटफॉर्म सजणार
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे सिनेमे आणि वेब सीरीज सणासुदीच्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'सरदार ऊधम सिंह',  'डिबुक','रश्मि रॉकेट', 'लिटल थिंग्स सीजन 4' अशी या सिनेमांची आणि वेबसीरीजची नावे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Twinkle Khanna Mughals Kebab Remark: 'इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघलांना हटवण्यापेक्षा, जेवणातून कबाब, कोफ्ता हटवा...'; पोस्ट करुन फसली ट्विंकल खन्ना, नेटकऱ्यांनी चोहीकडून झोडपलं
'इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघलांना हटवण्यापेक्षा, जेवणातून कबाब, कोफ्ता हटवा...'; पोस्ट करुन फसली ट्विंकल खन्ना, नेटकऱ्यांनी चोहीकडून झोडपलं
Mirzapur The Movie Box Office: 'मिर्झापूर द मुव्ही'नं मंडे टेस्ट केली पास; विकडेजमध्येही प्रेक्षकांमध्ये जादू कायम, किती कमावले?
'मिर्झापूर द मुव्ही'नं मंडे टेस्ट केली पास; विकडेजमध्येही प्रेक्षकांमध्ये जादू कायम, किती कमावले?
Sanjay Dutt Refuses To Speak Marathi: 'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
Singer Nisar Wayanad Death: ताप आल्याचं निमित्त झालं अन्... कॉन्सर्टच्या काही तास आधीच प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, धक्कादायक वृत्तानं इंडस्ट्रीत खळबळ
ताप आल्याचं निमित्त झालं अन्... कॉन्सर्टच्या काही तास आधीच प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, धक्कादायक वृत्तानं इंडस्ट्रीत खळबळ

व्हिडीओ

Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
Nana Patole: कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Sanjay Dutt Refuses To Speak Marathi: 'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
Embed widget