एक्स्प्लोर

Kriti Sanon Corona Positive | अभिनेत्री कृती सेननला कोरोनाची लागण; इन्स्टाग्रामवर दिली माहिती

Kriti Sanon Corona Positive : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नीतू सिंह यांच्यापाठोपाठ अभिनेत्री कृती सेनेनलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली.

मुंबई : आगामी चित्रपट 'जुग जुग जियो'च्या शुटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली होती. आता या सर्वांपाठोपाठ अभिनेत्री कृती सेननलाही कोरोनाची लागण झाली आहे. ती काही दिवसांपूर्वीच चंदिगढवरुन परतली होती. चंदिगढमध्ये ती आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकणात बीझी होती. या चित्रपटात कृती सेनन अभिनेता राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं की, तिच्या चित्रपटाच्या शूटिंगचं रॅपअप झालं आहे आणि ती घरी परतली आहे. दरम्यान, कृती सेननने मुंबईत फोटोग्राफर्सशी बोलताना सांगितलं की, एका सेकंदासाठीही मास्क काढू नका.

View this post on Instagram
 
A post shared by Kriti (@kritisanon)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनंतर अनलॉकच्या प्रक्रियेत अटी-शर्तींसह शुटींगसाठी परवानगी देण्यात आली. कृती सेननआधी अभिनेता वरुण धवन, नीतू कपूर यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघेही राज मेहता यांचा चित्रपट 'जुग जुग जियो'ची शूटींग करत होते. फिल्मफेयरने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाशी निगडीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील अॅक्टर्स, वरुण धवन, नीतू सिंह यांच्यासह दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, अनिल कपूर आणि कियारा अडवाणी यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु, त्यांची चाचणी नेगेटिव्ह आली होती.

कृती सेननच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर तिचा आगामी चित्रपटांच्या यादीत अक्षय कुमार स्टारर बच्चन पांडे या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाची शूटींग जानेवारी 2021 मध्ये करण्यात आली होती. तिच्या पहिल्या चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी आशुतोष गोवरिकर यांचा चित्रपट 'पानीपत'मध्ये ती दिसून आली होती. कृतीने आपल्या बॉलिवूड करियरची सुरुवात 2014 मध्ये हीरोपंती या चित्रपटातून केली होती. त्यानंतर दिलवाले, बरेली की बर्फी, राब्ता, लुका छुप्पी, पानीपत आणि इतर काही चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांची मोठ्या पडद्यावर एन्ट्री

'जुग जुग जियो' चित्रपटात एक फॅमिली ड्रामा दाखवण्यात येणार आहे. ज्याची निर्मिती करण जोहर करणार आहे. अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर 'जुग जुग जियो' या चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. जर नीतू कपूर यांच्याबाबत बोलायचं झालं तर, त्याचा आगामी चित्रपट 'कुली नं 1' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वरुण धवनचे वडील डेविड धवन यांनी केली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत साला अली खान स्क्रिन शेअर करणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget