एक्स्प्लोर

Kishor Kadam: 'आपण बोलून निघून जायचं, होईल जनतेचं जे व्हायचं...'; कवी सौमित्र यांच्या कवितेनं वेधलं अनेकांचे लक्ष

Kishor Kadam: नुकतीच कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी फेसबुकवर त्यांनी लिहिलेली एक कविता शेअर केली आहे. त्यांच्या या कवितेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Kishor Kadam: कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम (Kishor Kadam) हे कवितांच्या माध्यमातून विविध विषयांवरील भाष्य करतात. किशोर कदम हे चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. नुकतीच किशोर कदम यांनी फेसबुकवर त्यांनी लिहिलेली एक कविता शेअर केली आहे. त्यांच्या या कवितेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सौमित्र यांची कविता-

आपण बोलून निघून जायचं ..
होईल जनतेचं जे व्हायचं
आपल्याला काय..
आपण बोलुन निघुन जायचं...
आपल्याला काय..
केवढी जनता असते समोर
आपल्या जीवाला नस्ता घोर
सगळेच पक्ष लावतात जोर
कोण साधून् कोण चोर
आपली तशीच विचारधारा
जिकडे जसा वाहिल वारा
घालत राहायच्या येरझारा
जातोच निसटुन हातुन पारा
हेच लक्षण लक्षात ठेऊन
आपण येत जात ऱ्हायचं
तहाने सारखं व्याकुळ व्हायचं
जकडे झरा तिथलं प्यायचं
आपल्याला काय...
आपण पिउन निघुन जायचं
आपल्याला काय...
लोकांची पण सहनशक्ती
आपण ताणुन बघत नुस्ती
लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती
कैसा गांव कैसी बस्ती
आपलेच सगळे कार्यकर्ते
आपले कर्ते आपले धर्ते
जिधर घुमाव उधर फिरते
त्यांच्या हातात काय उरते
उद्या परवा विचार करू
नंतर त्यांना काय द्यायचं
आधी बघू काय खायचं
लोकशाहीचंच गाणं गायचं
आपल्याला काय..
आपण गाउन निघुन जायचं
आपल्याला काय..
चोविस तास बातम्या मिळोत
चॅनल्स जाहिराती गिळोत
न्याय अन्यायाशी पिळोत
एफबी इन्स्टा सारे फळोत
खड्डे सगळे तसेच सडोत
निकाल लांबणीवरती पडोत
नशिबाशी कामं अडोत
नको तशा घटना घडोत
जे जे हवं ते ते द्यायचं
तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं
कशालाही नाही भ्यायचं
आपल्याला काय..
वचनं देउन निघुन जायचं
आपल्याला काय..
रोज लोकांसमोर यायचं
रोज लोकांसमोर जायचं
माईक बंद चालू असो
आपण फक्तं बोलत ऱ्हायचं
आपल्याला काय ..
सौमित्र.
 
नेटकऱ्यांच्य कमेंट्स

अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन सौमित्र यांच्या या कवितेचं कौतुक केलं आहे.  एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'किशोर,चांगली चपराक दिलीस,हे वास्तव आहे' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,'व्यक्त होण्यासाठी प्रेरणा देताय तुम्ही.. स्वत: व्यक्त होऊन.'
 
किशोर कदम हे प्रसिद्ध कवी आणि अभिनेते आहेत. त्यांनी जोगवा, फँड्री या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Full PC ...तर दंगेखोरांची प्रॉपर्टी विकून टाणार! देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर इशाराTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 02PM : 22 March 2025: ABP MajhaHamid Engineer : औरंगजेबाचं तोंडभरुन कौतुक करणाऱ्या हमीद इंजिनिअरला बेड्या, नागपूर पोलिसांची कारवाईIndrajit Sawant PC : प्रशांत कोरटकर चिल्लर, हातावर तुरी देत पळून गेला असेल तर हे गृह खात्याचं अपयश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
JAC meeting on Delimitation : अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
Nitin Gadkari : जनता जातीयवादी नाही, पुढारी आहेत; आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात; नितीन गडकरी स्पष्टच बोलले
जनता जातीयवादी नाही, पुढारी आहेत; आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात; नितीन गडकरी स्पष्टच बोलले
Nagpur Violence: दंगलखोरांच्या घरावर बुलडोझर चालवणार का, दगडफेक करणाऱ्या मुलांच्या पालकांवर कारवाई? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
दंगलखोरांच्या घरावर बुलडोझर चालवणार का, दगडफेक करणाऱ्या मुलांच्या पालकांवर कारवाई? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
अन्नत्याग आंदोलनात बच्चू कडूंची तब्येत बिघडली, बीपी वाढला, शुगर डाऊन झाली, पहा Photos
अन्नत्याग आंदोलनात बच्चू कडूंची तब्येत बिघडली, बीपी वाढला, शुगर डाऊन झाली, पहा Photos
Embed widget