Khiladi Trailer Out : 'खिलाडी' सिनेमाचा ट्रेलर आऊट, रवी तेजाचा रोमॅंटिक अंदाज
Khiladi Trailer Out : रवी तेजाच्या 'खिलाडी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Khiladi Trailer Out : दाक्षिणात्य सुपरस्टार रवी तेजाच्या (Ravi Teja) बहुप्रतिक्षित 'खिलाडी' (Khiladi) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये रवी तेजा रोमॅंटिक अंदाजात दिसून येत आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'खिलाडी' सिनेमा 11 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रवी तेजासह या सिनेमात मीनाक्षी चौधरी आणि डिंपल हयाती यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. तसेच अर्जुन सर्जा आणि अनुसया भारद्वाज हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पेन स्टुडिओ निर्मित या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे.
View this post on Instagram
सिनेमाचे निर्माते जयंतीलाल गडा म्हणाले,"प्रेक्षकांना सध्या सत्य घटनेवर आधारित सिनेमे हवे आहेत. रवी तेजाच्या आगामी 'खिलाडी' सिनेमाची कथा अत्यंत मनोरंजक आहे. त्यामुळे हा सिनेमा हिंदी भाषेतही सिनेमागृहात प्रदर्शित व्हावा असे वाटले. सिनेमाचे कथानक वेगळे आहे. त्यामुळेच नक्कीच हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल."
रवी तेजाचे 'किक', 'राजा: द ग्रेट', 'बंगाल टायगर', 'विक्रमारकुडु' हे सिनेमे हिंदी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. 'खिलाडी' नंतर रवी तेजा 'रामाराव ऑन ड्युटी'मध्ये दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Jigna Vora : 'स्कॅम 1992' नंतर हंसल मेहता यांची नवी सीरिज; पत्रकार जिग्ना वोरा यांच्या पुस्तकावर आधारित असणार कथानक
Jhund Teaser : 'झुंड'चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष
Praveen Kumar Sobti : महाभारतातील 'भिम' प्रवीण कुमार सोबती यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha