Jigna Vora : 'स्कॅम 1992' नंतर हंसल मेहता यांची नवी सीरिज; पत्रकार जिग्ना वोरा यांच्या पुस्तकावर आधारित असणार कथानक
Jigna Vora : पत्रकार जिग्ना वोरा यांच्या पुस्तकावर आधारित वेबसीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
Jigna Vora : 'स्कॅम 1992' नंतर सिने निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) लवकरच एक नवीन वेबसीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या वेबसीरिजचे नाव 'स्कूप' (Scoop) असे आहे. ही वेबसीरिज एका सत्य घटनेवर आधारित असणार आहे. पत्रकार जिग्ना वोरा यांच्या 'बिहाइंड द बार्स इन भायखळा: माय डेज इन प्रिझन' ( Behind The Bars In Byculla: My Days in Prison) या चरित्रात्मक पुस्तकावर आधारित या वेबसीरिजचे कथानक असणार आहे.
करिश्मा तन्ना 'स्कूप' या वेबसीरिजमध्ये जिग्ना वोरा यांची भूमिका साकारणार आहे. करिश्मा तन्नाचा हा ओटीटीवरील दुसरा प्रोजेक्ट आहे. याआधी ती 'बुलेट्स' या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता 'स्कूप' या वेबसीरिजचे शूटिंग सुरू झाले आहे. जिग्ना वोरा यांनी लिहिलेल्या या चरित्रात्मक पुस्तकात जागृती पाठक या गुन्हेगारी पत्रकाराचा प्रवास दाखवण्यात आला आहे. जागृतीवर तिचाच सहकारी पत्रकार जयदेब सेनच्या हत्येचा आरोप आहे. त्यामुळे तिला तुरुगांतदेखील जावे लागते. तुरुंगात ती अशादेखील कैद्यांना भेटली ज्यांच्या गुन्हेगारीसंदर्भातील बातम्या तिने स्वत: केल्या होत्या.
Fresh off the press and soon to be streaming on Netflix, presenting you, Scoop 🗞️@MatchboxShots@sanjayroutray @Saritagpatil @NetflixIndia @mrunmayeelagoo pic.twitter.com/wyU5B3GYDy
— Hansal Mehta (@mehtahansal) February 8, 2022
या वेबसीरिजबद्दल हंसल मेहता म्हणाले, जिग्ना वोराचे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या डोक्यात चित्रीकरण करण्याचा विचार आला. आणि लगेचच मी या वेबसीरिजवर काम करायला सुरुवात केली. या वेबसीरिजबद्दल मला खूप उत्सुकता आहे. 'स्कूप' ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
हंसल मेहताच्या 'स्कॅम 1992', 'शाहिद' आणि 'अलिगढ' या सिनेमांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आणि सर्व सत्य घटनेवर आधारित आहेत. त्यामुळे त्यांची आगामी वेबसीरिजदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या
ओटीटीवर या आठवड्यात प्रदर्शित होणार या धमाकेदार सीरिज आणि हे चित्रपट
Praveen Kumar Sobti : महाभारतातील 'भिम' प्रवीण कुमार सोबती यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sonu Sood To Host Rodies : सोनू सूद दक्षिण आफ्रिकेतील 'रोडीज' करणार होस्ट, रणविजयने 18 वर्षांनंतर सोडला शो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha