Ketaki Mategaonkar: "तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील, आई असेल..."; ट्रोल करणाऱ्यांना केतकी माटेगावकरचं सडेतोड उत्तर
Ketaki Mategaonkar:केतकीनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केतकीनं बॉडी शेमिंग करणाऱ्या आणि ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
Ketaki Mategaonkar: गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. केतकी ही तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेक नेटकरी केतकीच्या सोशल मीडियावरील पोस्टला कमेंट्स करतात. काही जण कमेंट्स करुन केतकीचं कौतुक करतात तर काही जण केतकीला ट्रोल करतात. केतकीनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केतकीनं बॉडी शेमिंग करणाऱ्या आणि ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
केतकीची पोस्ट (Ketaki Mategaonkar Post)
केतकीनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, "प्रिय लोकं, ज्यांना माझ्याप्रमाणे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो, "किती बारीक आहेस गं", "अजून लहान मुलीचे कपडे घालतेस?","अरे खात जा जरा", "हं थंडी मानवलेली दिसतेय", "मागच्या वेळेस भेटलो तेव्हा छान बारीक होतास", आता पोट सुटलंय का जरा? नातेवाईक असो, ऑफिस मधले सहकर्मचारी असो, कोणीही असो…आपल्याला नेहमी या अशा वाक्यांना सामोरं जाव लागतं.
"मी एवढं म्हणेन, यात मी तुमच्याबरोबर आहे. कारण मी हे रिलेट करु शकते. पण तुमच्या शरीराचा अभिमान बाळगा. तुम्ही सुंदर आणि युनिक आहात. देवाने दिलेल्या या वेगळेपणाला महत्त्व द्याजर एखादा डॉक्टर, आहारतज्ज्ञ, पालक किंवा तुमचे मित्र ज्यांना तुमची मनापासून काळजी असेल, तर तुम्हाला ते जे काही सांगत असतात, त्यांचं ऐका. अशा व्यक्तीचं ऐकू नाका जी तुम्हाला खाली खेचून इच्छिते किंवा तुमचं वाईट विचार करते.", असंही केतकीनं पोस्टमध्ये लिहिलं.
पुढे केतकीनं लिहिलं, "डिअर ट्रोलर्स, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत, स्किनी, (हाडांचा सापळा) बारीक आहे. हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारीक, तशी मी सुद्धा आहे बारीक. तरीही अजिबात न थकता 17-18 तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं"
केतकीनं तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं, "थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असेल! पण म्हणून रोगी (Unhealthy) आहे का? तर अजिबात नाही! व्यायाम किंवा जीम हा फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीके.पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या शारिरीक भागावर (Body Parts) खुलेपणाने कमेंट करणं, याला तुम्ही ‘स्वातंत्र्य’ आणि ‘शाब्दिक स्वातंत्र्य’ असं नाव देता. आम्ही ट्रोलिंगपासून मुक्त झालो असलो तरी, 100 आणि 1000 सुंदर लोकांच्या तुलनेत तुमची संख्या फार कमी आहे. जे आम्हाला पाठिंबा देतात आणि प्रेरित करतात. आम्ही कलाकार सुद्धा माणसं आहोत. आम्हालाही दुखापत होते. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल. याचा विचार करा.आणि काही लोकं असे ही असतील ज्यांना खरंच वैद्यकीय समस्या (Medical problem) असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल… कल्पना करा की, तुम्ही त्यांना कोणत्या भयंकर मानसिक अवस्थेमध्ये टाकत आहात. थोडे दयाळू आणि प्रेमळ व्हा. थोडी सहानुभूती बाळगा."
View this post on Instagram
"माझ्या सर्व प्रिय चाहत्यांना, तुमच्या सतत प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी जशी आहे तशीच मला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला समजून घेता. तुमचे सकारात्मक संदेश, मला प्रेरित करतात. सर्वात महत्त्वाच म्हणजे जेव्हा असं काही घडतं तेव्हा तुम्ही पहिले असतात, जे मला तुमच्या प्रतिक्रियेतून आणि पोस्टमधून हसवतात. मी तुमचे डीएमस आणि मेसेजच्या कमेंट वाचते. तुम्ही दिलेला पाठिंबा पाहून मी खूप भारावून गेले आहे.मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगलं होत जाण्याचा प्रयत्न करतेय आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन. खूप सारं प्रेम, केतकी" असं केतकीनं पोस्टमध्ये लिहिलं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :