(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर; म्हणाला,लग्नाचे लाडू खावेत असं मलाही वाटतंय
Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Kartik Aaryan Wedding : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. आजवर त्याने अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. कार्तिकच्या सिनेमांची चाहते प्रतीक्षा करत असतात. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतचं एका कार्यक्रमात कार्तिकने लग्नासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यामुळे आता कार्तिक आर्यन लवकरच बोहल्यावर चढणार (Kartik Aaryan Wedding) असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो आहे,"सर्वांना नमस्कार.. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की मी इथे बॅंड का आणला आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये एकमागून एक सर्वांचे बॅंड वाजत आहेत. जवळची मंडळी बोहल्यावर चढत आहे. त्यांची विकेट पडत आहे. आता मीच सिंगल राहिलो आहे. त्यामुळे आता माझीदेखील लग्न करण्याची इच्छा होत आहे. लग्नाचे लाडू खावेत असं मलाही वाटत आहे".
View this post on Instagram
कार्तिक आर्यन पुढे म्हणतो,"आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माझ्या चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला सांगू इच्छितो की, मी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे". कार्तिकच्या या घोषणेनंतर उपस्थित असणाऱ्या सर्वांना हसू अनावर झालं आहे. तर दुसरीकडे त्याचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत.
कार्तिक आर्यन कोणासोबत लग्नबंधनात अडकणार?
कार्तिक आर्यनने लग्न करणार असल्याची घोषणा केल्यानंतर तो कोणासोबत लग्न करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आजवर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे. कार्तिकने सारा अली खानसोबत लग्न करावं, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. तर दुसरीकडे तो हृतिक रोशनची बहीण पश्मिनाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
कार्तिक आर्यनने आगामी प्रोजेक्ट (Kartik Aaryan Upcoming Movies)
कार्तिक आर्यनचा 'शहजादा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता कार्तिकचे 'सत्यप्रेम की कथा', 'आशिकी 3' आणि 'कॅप्टन इंडिया' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या