Bhool Bhulaiyaa 3 : "गोष्ट अजून संपलेली नाही...", कार्तिक आर्यनने शेअर केला 'भूल भुलैया 3'चा टीझर; जाणून घ्या सिनेमा कधी रिलीज होणार?
Bhool Bhulaiyaa 3 Teaser : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 3 Teaser Released : बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) पुन्हा एकदा रुह बाबाच्या (Rooh Baba) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. 'भूल भुलैया 2' नंतर चाहते या सिनेमाच्या पुढल्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान कार्तिकने 'भूल भुलैया 3'चा (Bhool Bhulaiyaa 3) टीझर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'भूल भुलैया 3'ची घोषणा केली आहे.
'भूल भुलैया 3'चा टीझर आऊट! (Bhool Bhulaiyaa 3 Teaser Out)
कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया 3'चा टीझर (Bhool Bhulaiyaa 3 Teaser) शेअर केला आहे. या टीझरमध्ये कार्तिक रुह बाबाच्या भूमिकेत दिसत आहे. कार्तिक म्हणतो की, "गोष्ट अजून संपलेली नाही....दरवाजे बंद केले आहेत जेणेकरुन ते पुन्हा उघडता येतील. मी फक्त आत्म्यांशी बोलत नाही तर आत्मे माझ्या आत येतात." कार्तिकचे चाहते आता 'भूल भुलैया 3'ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
'भूल भुलैया 3' कधी रिलीज होणार? (Bhool Bhulaiyaa 3 Resease Date)
कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया 3' या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यासोबत या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. टीझर शेअर करण्यासोबत त्याने लिहिलं आहे, "रुह बाबा परत येतोय 2024 च्या दिवाळीत." त्यामुळे 2024 च्या दिवाळीत पुन्हा एकदा कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया'ची (Bhool Bhulaiyaa 3) जादू पाहायला मिळणार आहे.
कार्तिकच्या 'भूल भुलैया 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमाच्या यशानंतर निर्मात्यांनी या सिनेमाच्या पुढच्या भागाच्या तयारीला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे सिनेसृष्टीला वाईट दिवस आले होते. प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत होते. त्यामुळे अनेक बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. दरम्यान कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या सिनेमाने सिने-प्रेक्षकांना वेड लावलं. या सिनेमामुळे प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळाली. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 185 कोटींची कमाई केली होती.