एक्स्प्लोर
दीपिकाच्या 'त्या' विधानावर करिनाची तीव्र नाराजी

मुंबईः मी प्रेग्नंट नाही आणि लग्नही करणार नाही, असं बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वी तिच्या आणि रणवीर सिंहच्या लग्नाबद्दलच्या अफवांना उत्तर देत सांगितलं होतं. मात्र हे विधान करिना कपूरने फारच वैयक्तिक घेतलं असल्याचं दिसत आहे. दीपिकाने आपल्या लग्नाबद्दलच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना प्रेग्नंट आहे म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण दीपिका प्रेग्नंट आहे, असं कोणीही म्हणालेलं नाही. त्यामुळे दीपिकाला स्पष्टीकरण देताना हा साधा सेन्स असावा, असं करिनाचं मत असल्याची माहिती आहे. दीपिकाने या विधानातून आपल्याला टोमणा मारला आहे, असा समज करिनाचा झाला आहे. त्यामुळं ती सध्या नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. करिना प्रेग्नंट असतानाही आगामी चित्रपटाची शुटींग करणार आहे.
आणखी वाचा























