Kareena Kapoor Covid Negative : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर कोरोनामुक्त
Kareena Kapoor Covid Negative : करीना कपूरची 'कोविड - 19' चाचणी निगेटिव्ह आली आहे. करीनाने सैफ अली खानचेदेखील आभार मानले आहेत.
Kareena Kapoor Covid Negative : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची (Kareena Kapoor) 'कोविड - 19' चाचणी निगेटिव्ह आली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने कोरोनामुक्त झाल्याचे कळवले आहे. करीना सिने-निर्माते करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये ती सहभागी झाली होती. त्या पार्टीतच करीनाला कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले गेले.
करीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीच्या माध्यमातून तिने करिश्मा कपूर, सैफ अली खान आणि मित्रांचे आभार मानले आहेत. तसेच तिने करिश्माबद्दल कृतज्ञतादेखील व्यक्त केली आहे. 'कोविड - 19' चाचणी निगेटिव्ह आली असल्याचेदेखील तिने लिहिले आहे. तसेच तिने बीएमसीचेदेखील जाहीर आभार मानले आहेत.
तैमूर अली खान आणि जहांगीर या दोन मुलांना भेटू न शकल्यामुळे करीनाने यापूर्वी आपली असहायता व्यक्त केली होती. त्यामुळे सगळ्यात आधी आता ती तिच्या मुलांना भेटणार आहे. करीनाचा आगामी लाल सिंह चड्ढा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा
बहुप्रतिक्षित चित्रपट एप्रिल 2022 मध्ये रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात करीनासोबत आमिर खान दिसणार आहे.
करीनाला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच तिने स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले होते. तसेच खबरदारी घेत ती कोरोना नियमांचे पालन करत होती. क्वारंटाईन असल्यामुळे करीनाला तिच्या मुलाची आणि नवऱ्याची म्हणजेच सैफ अली खानची आठवण येत होती. कोरोना काळातदेखील तिचे पती आणि मुलावरील प्रेम कमी झालेले दिसले नाही.
संबंधित बातम्या
Sher Shivraj : फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' झळकणार रुपेरी पडद्यावर
Radhe Shyam Trailer : Prabhas च्या आगामी 'राधे श्याम'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, हिंदी भाषेतदेखील होणार प्रदर्शित
Bigg Boss 15 : बिग बॉसमध्ये Rakhi Sawant भावनिक; म्हणाली, 'इंडस्ट्रीत टिकण्यासाठी खूप काही सहन करावे लागले'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha