एक्स्प्लोर

'ऐ दिल..' विरोधात रिव्ह्यू, अजयची 25 लाखांची ऑफर : केआरके

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन आणि सोशल मीडियावरील वाचाळवीर अशी ख्याती असलेला कमाल खान यांच्यात आता ऑनलाईन युद्ध छेडलं आहे. आपला महत्त्वाकांक्षी चित्रपट 'शिवाय'चं नुकसान करण्यासाठी कट रचल्याचा आरोप अजयने केआरके आणि करण जोहरवर केला आहे.   अजयच्या 'शिवाय' आणि करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटांची दिवाळीला बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. करण आणि कमाल आर खान यांनी मिळून कट रचल्याचा संशय अजय देवगनने व्यक्त केला आहे. अजयने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.   अजयने ट्वीट केलेल्या एका ऑडिओमध्ये कमाल खान आणि सहनिर्माते कुमार मंगत यांच्यातील बातचित रेकॉर्ड केली आहे. 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाचा वाईट रिव्ह्यू न देण्याबद्दल करण जोहरने आपल्याला 25 लाख दिल्याचा दावा या टेपमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळेच अजयने करण जोहरवरही संशयाची सुई रोखली आहे.   केआरके अनेक चित्रपटांची रिव्ह्यूमधून खिल्ली उडवतो. यावेळी अजयच्या 'शिवाय'वर त्याने निशाणा साधला. अजय देवगनने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याचा समाचार घेतला आहे. 'मी गेल्या 25 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. माझे वडीलही अॅक्शन दिग्दर्शक होते. अशात कमालसारखा कोणी माणूस उठून आमच्या सिनेमाला वाईटसाईट बोलतो. पैसे उकळण्यासाठी त्याने हा डाव आखला आहे' असं अजय म्हणतो.   https://twitter.com/ajaydevgn/status/771384971449597952     या प्रकरणाची प्रामाणिकपणे पडताळणी व्हायला हवी, जर करण जोहरचा खरंच यामागे हात असेल, तर त्याचाही तपास व्हावा, अशी मागणी अजयने केली आहे.     https://twitter.com/kamaalrkhan/status/771415382934650880   https://twitter.com/kamaalrkhan/status/771416199532077057   केआरकेने मात्र कुमार मंगत आणि अजय यांनीच आपल्याला 25 लाखांची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'विषयी वाईट बोलण्यास त्यांनी पैशांची लालुच दाखवली, मात्र आपण ती नाकारल्याचं केआरके सांगतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget