एक्स्प्लोर
टॉप सर्चमध्ये शाहरुखला मागे टाकत कपिलची बाजी
नवी दिल्ली : याहूने नुकतीच सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कॉमेडीस्टार कपिल शर्माने दुसरं स्थान पटकावलं आहे. तर अभिनेता सलमान खान पहिल्या क्रमांकावर आहे.
कपिलने दिग्गज अभिनेत्यांना मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरुख खान आणि आमीर खान यांनाही कपिलने मागे टाकलं आहे.
कपिलने 'दी ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज 3' या कॉमेडी शोमधून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमधील यशानंतर कपिलने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं.
कपिलने आतापर्यंत 'उस्तादो का उस्ताद', 'कॉमेडी सर्कस', 'स्टार या रॉकस्टार' अशा कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली. 2013 मध्ये कपिलने 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या शोची सुरुवात केली. त्यानंतर 'किस किसको प्यार करु' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्रीही केली.
दरम्यान महिला सेलिब्रेटींच्या यादीत सनी लिओनी पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement