महापालिकेने पाडकाम केल्यावर कंगनाचा ट्विटरवर थयथयाट; पालिकेला म्हणाली बाबरची आर्मी
एकीकडे कंगना रनौत मुंबईला येण्यासाठी चंदीगडहून निघाली आहे, त्याचवेळी इथे मुंबईत कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात करण्यात आली. तूर्तास आता ही कारवाई थांबवण्यात आली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आज मुंबईत दाखल होणार आहे. ती चंदीगडहून मुंबईसाठी निघाली आहे. त्याचवेळी मुंबईत महानगरपालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाई करत आहेत. महापालिका दोन कॅमेऱ्यातून या कारवाईचं चित्रीकरण केलं जाणार आहे. तसेच कंगनच्या कार्यालया बाहेरचा स्लॅब अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे. यावर कंगना रनौतने ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बाबरची आर्मी असं संबोधलं आहे. तसेच आपलं ऑफिस राम मंदिर असल्याचं म्हटलं आहे.
कंगनाचं ट्वीट :
मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम 🙏 pic.twitter.com/KvY9T0Nkvi
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
कंगना रनौतनं ट्वीट करत म्हटलं आहे की, ''मणिकर्णिका फिल्म्ज'मध्ये 'अयोध्या'ची घोषणा केली होती. ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल, राम मंदिर पुन्हा पडणार. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनणार, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम.'
कंगनाचं ट्वीट :
Pakistan.... #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
कंगना रनौतने आपल्या ट्वीटची मालिका सुरुच ठेवली आहे. या तोडक कारवाईचे फोटो ट्वीट करुन 'पाकिस्तान'असं तिने कॅप्शन दिलं आहे. शिवाय #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे. दरम्यान, आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणाऱ्या कंगनाने महापालिकेच्या कारवाईनंतर आता थेट मुंबईला पाकिस्तान असं संबोधलं आहे.
दरम्यान, कंगनाच्या कार्यालयाच्या बांधकामाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मुदत दिली होती. महापालिका सगळ्यांना वेळ देते. अवैध बांधकामावर कारवाई केली नाही तर तुम्हीच बोलणार. ही कारवाई अवैध बांधकामावरच होत आहे. नियमित बांधकामावर होत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाईबाबत दिली.
पाहा व्हिडीओ : ही कारवाई अवैध बांधकामावरच : किशोरी पेडणेकर
कंगनाला चुकीची आणि अवैध्य नोटीस
कंगनाच्या वकिलांनी सांगितलं आहे की, बीएमसी द्वारे 'स्टॉप वर्क' अंतर्गत जी नोटीस कंगनाच्या ऑफिसच्या गेटवर लावण्यात आली आहे. ती चुकीची आहे. अवैध्य आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं अवैध्य काम सुरु नव्हतं. मग 'स्टॉप वर्क' नोटीस कशाच्या आधारावर देण्यात आलं? कंगनाच्या वकिलांनी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले की, बीएमसीने बंगल्यात बदल केल्याची बाब नोटीसमध्ये दिली आहे. अशातच कायदेशीररित्या कंगनाला 7 दिवसांत जबाब देण्याची नोटीस जारी केली पाहिजे होती. पण बीएमसीने फक्त एक दिवसांत जबाब देण्याची नोटीस जारी केली आहे. हे मुद्दाम कंगनाला त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचंही कंगनाचे वकिल म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात
- बीएमसीने कंगनाला पाठवलेली नोटीस बेकायदेशीर; कंगना रनौतच्या वकिलांचा आरोप
- कंगना रनौतच्या ऑफिसला महापालिकेकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा कंगनावर ठपका
- ना डरूंगी, ना झुकूँगी.... मुंबईत येण्यापूर्वी कंगना रनौतचं ट्वीट
- 'मुंबाई मातेचा अवमान करणारे बेइमान', सामनातून टीका, कंगनानंही दिलं उत्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
