एक्स्प्लोर
कंगना रणौतच्या 'पंगा' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, फक्त 24 तासांत 44 मिलियन व्ह्यूज
कंगना रणौतचा चित्रपट 'पंगा'चा ट्रेलर लॉन्च होताच अवघ्या 24 तासांत 44 मिलियन व्ह्यूज क्रॉस केले होते. यावरून कंगनाने कोट्यवधी फॅन्सच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे, हे स्पष्ट होतं.

Panga Trailer : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कंगनाच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पण या ट्रेलरने एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 2019मध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला ट्रेलर म्हणून पंगाने मान पटकावला आहे. 'पंगा'च्या ट्रेलरने यावर्षी रिलीज करण्यात आलेल्या 'दबंग', 'सुपर 30', 'स्ट्रीट डांसर' यांसारख्या मोठ्या चित्रपटांच्या ट्रेलरलाही मागे टाकलं आहे.
आपल्या वक्तव्यांमुळे सतत वादात असणारी बॉलिवुडची क्वीन कंगना राणावत पुन्हा एकदा 'पंगा' घेणार आहे. पण, हा 'पंगा' कोणाशी वाद नसून तिच्या आगामी चित्रपटाचं टायटल आहे. 2018 या वर्षात मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी आणि जजमेंटल है क्या हे दोन चित्रपट सुमार चालल्यानंतर तिचा नवीन वर्षातील हा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यामुळचं या चित्रपटाकडून कंगनाला खूप अपेक्षा असणार आहेत.
कंगनाचा हा लूक फार वेगळा आहे. पहिली झलक पाहिल्यानंतर 'क्वीन'मधील साधेपणा आणि 'तन्नू वेड्स मन्नू'मधील तिचा लूक आठवतो. दरम्यान, या चित्रपटात कंगना पुन्हा एकदा युनिक कॅरेक्टर घेऊन चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. या चित्रपटाची टॅगलाइन 'जो सपने देखने हैं वो पंगा लेते है' असं आहे. पाहा ट्रेलर : काही दिवसांपूर्वी कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. पोस्टरबाबत बोलायचं झालं तर यामध्ये कंगना इंडियन लूकमध्ये असून ती मनमोकळेपणाने हसत आहे. असं म्हटलं जातं की, या चित्रपटामध्ये कंगना आईची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, पंगा 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, कंगना रणौतचा चित्रपट 'पंगा'चा ट्रेलर लॉन्च होताच अवघ्या 24 तासांत 44 मिलियन व्ह्यूज क्रॉस केले होते. यावरून कंगनाने कोट्यवधी फॅन्सच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे, हे स्पष्ट होतं. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता भूमिकेतही झळकणार कंगना : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'थलाइवी'मध्ये कंगना झळकणार आहे. यात ती दिवंगत जयललिता यांची भूमिका साकरणार आहे. हा चित्रपटही पुढील वर्षी 26 जून 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संबंधित बातम्या : 62 पुरस्कार पटकावणाऱ्या 'स्कॉटलॅन्ड' चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन 'बंटी और बबली 2'ची शुटिंग सुरू, 11 वर्षांनी एकत्र दिसणार सैफ अली खान आणि राणी मुखर्जी 2019मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले चित्रपट मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
